Dragon Fruit : ड्रॅगन फ्रूट ला आरोग्यदायी का मानले जाते?

ड्रॅगन फ्रूट ही निवडुंग प्रकारातील वनस्पती असून, ती वेगवेगळ्या हवामानामध्ये येते. अत्यंत काटक असलेल्या या वनस्पतीची लागवड आपल्याकडेही कमी- अधिक क्षेत्रावर होऊ लागली आहे.
Dragon Fruit
Dragon FruitAgrowon

ड्रॅगन फ्रूट (Dragon Fruit) ही निवडुंग प्रकारातील वनस्पती असून, ती वेगवेगळ्या हवामानामध्ये येते. अत्यंत काटक असलेल्या या वनस्पतीची लागवड आपल्याकडेही कमी- अधिक क्षेत्रावर होऊ लागली आहे. लागवडीनंतर सुमारे १५ महिन्यांनी उत्पादनाला सुरवात होत असली तरी पूर्ण क्षमतेने उत्पादन हाती येण्यासाठी तीन वर्षांचा काळ लागतो. काढणीचा काळ साधारणतः मे ते सप्टेंबर या दरम्यान असतो. एकरी सरासरी सुमारे पाच टनांपर्यंत उत्पादन मिळू शकते. कमी शर्करा असलेल्या फळांमध्ये ड्रॅगन फ्रूट हे महत्त्वाचे फळ आहे. भारतीय ग्राहकांची गरज भागवण्यासाठी प्रामुख्याने या फळांची आयात होत असे. मात्र, अलीकडे या फळाची लागवडही वाढू लागली आहे. या फळांपासून प्रक्रिया पदार्थाची निर्मिती केल्यास मागणी वाढू शकेल. 

Dragon Fruit
ड्रॅगन फ्रूट लागवडीचे तंत्र

हे फळ मूळ मेक्सिको, मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील आहे. या फळामध्ये मलईदार गर असून, त्याला विशिष्ट असा सुगंध असतो. फळ कापल्यानंतर गर सहजतेने काढता येतो. त्यात असलेल्या काळ्या छोट्या बियांमुळे खाताना त्याचा पोत एकाच वेळी मलईदार आणि कुरकुरीत लागतो.

गर कच्चा खाताना किचिंत गोड लागतो. त्याला कॅलरीचे प्रमाण कमी आहे. त्यातील बिया खाता येतात. बियांना किचिंत मातकट बदामासारखी चव लागते. या फळामध्ये भरपूर पाणी, खनिजे आणि पोषक घटक असतात.

गुलाबी गर असलेल्या फळाला अधिक मागणी असली तरी अन्य पांढऱ्या गराचा विशेष चाहता वर्ग आहे. या फळांना ताज्या स्वरूपामध्ये मोठी मागणी असते. त्याचप्रमाणे ड्रॅगन फ्रूट पासून बनविलेल्या मूल्यवर्धित पदार्थांनाही वाव आहे. या फळापासून फ्रूट बार, आइस्क्रीम, जेली, मार्मालेड, रस, पेस्ट्री, गर आणि गोड दही (योगर्ट) तयार करता येते.

Dragon Fruit
अशी करा ड्रॅगन फ्रूट रोपनिर्मिती...

आरोग्यासाठी फायदे ः

उच्च प्रतीची अॅण्टिऑक्सिडंट्स. क जीवनसत्त्वाने परिपूर्ण असून, प्रतिकारकक्षमता वाढवते.

याच्या गरामध्ये उत्तम बहू असंपृक्त मेदाम्ले असतात. त्यात फॅट्स मेंदूसाठी फायद्याचे असून, शरीराचे वजन कमी करण्यासाठी साह्य करते.

ब जीवनसत्त्व भरपूर असतात.

कॅल्शिअमचे प्रमाण उच्च असल्याने हाडांच्या आरोग्यासाठी फायद्याची ठरतात.

कॅरोटिन असून, बियांतील ओमेगा ३ मेदाम्ले डोळ्यांसाठी उपयुक्त ठरतात. डोळ्यांची दृष्टी सुधारते.

कोलेस्टेरॉल कमी करणे, पोटाच्या विकारावर, रक्तातील शर्करा कमी करणे या प्रकारे उपयुक्त.

हिमोग्लोबिन कमी होण्याचा धोका टाळता येतो.

हृदयाचे आरोग्य सुधारते.

कर्करोग व जन्मजात काचबिंदू (कॉन्जिनीटाल ग्लुकोमा) रोखण्यास मदत करते.

प्रतिकारकशक्ती वाढवते.

संधिवातातील वेदना कमी करते.

दात आणि हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त.

शरीरातील पेशीच्या दुरुस्तीसाठी उपयुक्त.

डेंग्यू रुग्णासाठी उपकारक.

मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी फायदेशीर.

हे कमी कॅलरीयुक्त अन्न आहे. काही अभ्यासामध्ये यामध्ये रक्तातील शर्करा कमी करण्याची क्षमता असल्याचे पुढे आले आहे.

या फळामध्ये तंतूमय पदार्थाचे प्रमाण अत्यंत कमी आहे, त्यामुळे त्यातील उच्च फ्रुक्टोज सावकाश कमी होते. हे शर्करा असलेल्या लोकांसाठी फारसे योग्य मानले जात नाही.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com