Land Nominee : खरे नातेवाईक आणि वारसही कोण?

एका गावात मंजुळाबाई नावाची विधवा म्हातारी राहत होती. म्हाताऱ्या मंजुळाबाईची गावात चार एकर जमीन होती. मंजुळाबाईला मूलबाळ नसल्यामुळे गावातील शेजारचे लोक मंजुळाबाईची काळजी घेत होते.
 Land
LandAgrowon

Indian Agriculture : एका गावात मंजुळाबाई नावाची विधवा म्हातारी राहत होती. म्हाताऱ्या मंजुळाबाईची गावात चार एकर जमीन होती. मंजुळाबाईला मूलबाळ नसल्यामुळे गावातील शेजारचे लोक मंजुळाबाईची काळजी घेत होते.

गावातील तुकाराम नावाचा एक माणूस मंजुळाबाईच्या शेतात शेतमजूर म्हणून काम करायचा व तो म्हाताऱ्या मंजुळाबाईची काळजी सुद्धा घेत होता. एक दिवस मंजुळाबाई आजारी पडली.

त्या आजारात मंजुळाबाईच्या शेतात काम करणारा तुकाराम म्हातारीची संपूर्ण सेवा करत होता. एक दिवस म्हातारी मरण पावली तेव्हा तुकाराम हाच मंजुळाबाईजवळ होता व तुकारामनेच म्हाताऱ्या मंजुळाबाईला शेवटचे पाणी पाजले.

मंजुळाबाई मेल्यानंतर मात्र तिचे पुतणे, भाचे, असे सर्व नातेवाईक गावात म्हातारीच्या घरी जमा झाले. असाच एक महिना गेल्यानंतर तुकारामने असा अर्ज दिला, की मयत म्हाताऱ्या मंजुळाबाईला मीच मरताना पाणी पाजले, त्यामुळे मीच म्हातारीचा वारस आहे.’’

 Land
Shekhar Gaikwad : .. तर जमिनीचे खरे वारसदार कोण?

त्यावर मयत मंजुळाबाईचा एक पुतण्या तुकारामला म्हणाला, ‘‘तुझ्या एक घोटभर पाण्याच्या बदल्यात मिनरल वॉटरच्या १० बाटल्या मी तुला आणून देतो, पण तू या जमिनीचा व म्हातारीचा वारस कसा ठरतो ते तर सांग?’’

शेवटी मंजुळाबाईच्या पुतण्याचा व तुकारामचा वाद कोर्टात गेला. जोपर्यंत म्हातारी मंजुळाबाई जिवंत होती, तोपर्यंत एकही नातेवाईक म्हातारीला विचारत नव्हता. परंतु म्हातारी मेल्यानंतर मात्र चार एकर जमिनीसाठी सगळे नातेवाईक गोळा झाले होते.

सांगायचे तात्पर्य म्हणजे मरताना पाणी पाजले म्हणून वारस म्हणून मालकीहक्क लावण्याचा प्रयत्न अद्‍भुत आहे, पण खरे नातेवाईक कोणाला म्हणायचे हा प्रश्‍न मात्र गावातल्या सगळ्यांना पडल्याशिवाय राहिला नाही.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com