Impact of Unseasonal Rain: आर्णी येथे मंगळवारी (ता. ५) दुपारी अचानक झालेल्या पावसाने बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला सुमारे १५०० क्विंटल गहू भिजला. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून बाजार समिती प्रशासनाच्या निष्काळजीपणा विरोधात शेतकऱ्यांनी एकत्रित येत तीव्र रोष व्यक्त केला..आर्णी बाजार समितीत गव्हाचा लिलाव आठवड्यातून दोन दिवस घेतला जातो. मंगळवारी (ता. ५ एप्रिल) लिलावाच्या दिवशी सुमारे तीन हजार क्विंटल पेक्षा अधिक गहू विक्रीसाठी आणण्यात आला होता..Rain Crop Damage: पावसामुळे पूर्व विदर्भातील ६३०३ शेतकऱ्यांना फटका.यापैकी सुमारे १५०० क्विंटल गहू शेडमध्ये ठेवून लिलाव पूर्ण करण्यात आला होता, तर उर्वरित गहू बाहेरच पडून होता. दुपारी सुमारे साडेतीन वाजता अचानक पावसाची हजेरी लागल्याने बाहेर ठेवलेला अंदाजे १५०० क्विंटल गहू भिजला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी एकत्र येत बाजार समितीचे सचिव विशाल राठोड यांना जाब विचारला..‘‘व्यापाऱ्यांचा माल टीनशेडमध्ये सुरक्षित ठेवता, मग शेतकऱ्यांचा माल बाहेर का ठेवला,’’ असा सवाल करत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली. यामुळे बाजार समिती परिसरात चांगलेच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते..Unseasonal Rain Damages: पूर्व मोसमी पावसाने साडेचारशे हेक्टरवरील पिके बाधित.दुजाभावाचा आरोपआर्णी बाजार समितीत व्यापाऱ्यांना प्राधान्य देऊन त्यांचा माल टीनशेडमध्ये ठेवला जातो, तर शेतकऱ्यांचा माल उघड्यावर ठेवला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. या दुजाभावामुळेच आजच्या पावसात शेतकऱ्यांची मोठे नुकसान झाल्याचा आरोप करीत संताप व्यक्त करण्यात आला..आज बाजार समितीत सुमारे ३ हजार क्विंटल गव्हाची आवक होती. त्यापैकी शेडमधील १५०० क्विंटल गव्हाचा लिलाव झाला, तर बाहेर ठेवलेला सुमारे १५०० क्विंटल गहू पावसात भिजला. भिजलेला गहू वेगळा करून पोत्यात भरून ठेवण्यात येत आहे. उर्वरित गव्हाचा लिलाव उद्या (ता. ६ एप्रिल) करण्यात येईल.विशाल राठोड, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, आर्णी