Pune News: मनरेगामधील प्रस्तावित बदलांवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. नागपूर येथे आज (ता.२७) झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी गरीब मजुरांसाठी असलेली ही योजना कमकुवत केली जात असल्याचा आरोप करत, गांधीजींचे नाव हटवून ‘VB-G RAM G’ असे नामकरण करण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले..वडेट्टीवार पुढे म्हणाले की, "मनरेगा ही रोजगार हमी योजना काँग्रेस सरकारच्या काळात ग्रामीण भागातील बेरोजगारांसाठी आणली गेली होती. मोदी सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी मनरेगावर डिवचले, पण लोकांच्या अवलंबित्वामुळे योजनेचे महत्त्व त्यांना समजले. मात्र आता गांधीजींचे नाव हटवून 'G-RAM G' सारखे नवीन स्वरूप देण्याचा डाव रचला जात आहे" असा आरोपही वडेट्टीवारांनी केला..MGNREGA: तामिळनाडूचा ‘मनरेगा’ नावाचाच आग्रह."राष्ट्रपित्यांचे नाव काढून सरकारला काय मिळेल?"ही योजना कमकुवत करण्याचा षडयंत्र आहे, असे ते म्हणाले. "महात्मा गांधींचे नाव काढून सरकारला काय मिळेल? राष्ट्रपित्यांनी स्वातंत्र्यलढ्यात मोलाची भूमिका बजावली. आज हे सरकार त्यांचे नाव घेते, पण रोजगाराच्या संधी कमी करत आहे. यामुळे जनतेचा राग वाढत आहे असेही ते म्हणाले..MGNREGA Success: शंभरहून अधिक कुटुंबे ‘मनरेगा’तून झाली लखपती.‘मनरेगा वाचवा’ आंदोलन तीव्र करणारतसेच, ‘मनरेगा वाचवा’ आंदोलनाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, सरकारने यापूर्वीच्या आंदोलनावेळी आश्वासने देऊन जनतेला शांत केले, पण ती पाळली नाहीत. यावेळी जनता मागे हटणार नाही आणि सरकारला फसवणुकीचे उत्तर द्यावे लागेल. शेतकऱ्यांकडे सरकारची उदासीनता आणि रुपयाच्या घसरणीसाठीही त्यांनी केंद्र सरकारला जबाबदार धरले..दरम्यान, गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन (ग्रामीण)’चे समर्थन करत काँग्रेसवर खोटा प्रचार केल्याचा आरोप केला होता. यावर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार म्हणाले, "हा गांधीजींचा सत्य नाही, तर सत्याचा अपमान आहे. आंदोलने आणि मोहिमा अनेक असतात, पण काँग्रेसची ‘बचाव मनरेगा’ मोहीम ‘संग्राम’ म्हणणे ही चुकीची शब्दावली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.