Krushi Melava : ‘वनामकृवि’मध्ये २१ पासून पश्चिम विभागीय कृषी मेळावा

VNMKV Parbhani : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व आत्मातर्फे पश्चिम विभागीय कृषी मेळावा व कृषी प्रदर्शनाचे आयोजन बुधवार (ता.२१) ते शुक्रवार (ता.२३) या कालावधीत परभणी कृषी विद्यापीठातील क्रीडा संकुल मैदानावर करण्यात आले आहे.
VNM Agricultural University
VNM Agricultural University Agrowon

Parbhani News : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व आत्मातर्फे पश्चिम विभागीय कृषी मेळावा व कृषी प्रदर्शनाचे आयोजन बुधवार (ता.२१) ते शुक्रवार (ता.२३) या कालावधीत परभणी कृषी विद्यापीठातील क्रीडा संकुल मैदानावर करण्यात आले आहे.

‘‘हवामानानुकूल शाश्वत शेतीद्वारे शेतकऱ्यांची समृद्धी ही या मेळाव्याची थीम आहे. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा ही ६ राज्ये आणि दीव दमण आणि दादर नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ, धोरणकर्ते यामध्ये सहभागी होणार आहेत. बुधवारी सकाळी साडेदहा वाजता या मेळाव्याचे उद्‍घाटन होईल,’’ अशी माहिती कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

VNM Agricultural University
VNMKV Research : ‘वनामकृवि’स संशोधनासाठी २५ कोटींचा निधी मंजूर

डॉ. मणी म्हणाले, ‘‘या प्रदर्शनात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील नावीन्यपूर्ण कृषी तंत्रज्ञान, कृषी संशोधन, अवजारे, सिंचनाचे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना पाहण्यास मिळेल. कृषी तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील संस्था, अशासकीय संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला स्वयंसाह्यता गट आदींच्या २०० पेक्षा अधिक दालनाचा समावेश असेल.

त्यात दर्जेदार बियाणे, रोपे, विविध प्रकारच्या कृषी निविष्ठा, डिजिटल शेती आणि ड्रोन तंत्रज्ञान, पशुसंवर्धन आदीचा समावेश राहील. उद्‍घाटनावेळी राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची तर समारोपास कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची उपस्थिती राहील. विविध चर्चासत्रांत प्रगतिशील शेतकरी, तज्ज्ञ, अधिकारी सहभागी होतील.

VNM Agricultural University
VNMKV Parbhani : ‘वनामकृवि’अंतर्गत समित्या स्थापन

पत्रकार परिषदेस शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रवीण कापसे आदी उपस्थित होते.

चर्चासत्रांत सेंद्रियसह आधुनिक शेतीवर मार्गदर्शन

तांत्रिक चर्चासत्रामध्ये शाश्वत शेतीकरिता एकात्मिक शेती पद्धती, डिजिटल शेती ः ड्रोन, आयजीव्ही व रोबोट, शेतकऱ्यांऱ्यासाठी विविध शासकीय योजना, बिगर शासकीय योजना व औद्योगिक योजना, उपजीविका व पोषण सुरक्षितेकरिता भरडधान्य, कृषी पर्यटन, सेंद्रिय व नैसर्गिक शेती या विषयावर तज्ज्ञ, अनुभवी शेतकरी मार्गदर्शन करणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com