West Vidarbha : अकोला पश्चिम विदर्भात यंदा झालेल्या कमी पावसाचा फटका केवळ खरीप पिकांनाच नव्हे, तर प्रमुख जलप्रकल्पांनाही बसला आहे. ऑगस्ट महिना जवळपास कोरडाच गेल्याने अनेक प्रकल्प अपेक्षेप्रमाणे भरलेले नाहीत. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. विशेषतः पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून असलेल्या प्रकल्पांतील कमी साठ्यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे..अकोला जिल्ह्यातील वान प्रकल्पात सध्या ८४.०४ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी ८५.१७ टक्के साठा होता. प्रकल्पाची क्षमता ८१.९६ दलघमी असून सध्या ६८.८८ दलघमी साठा आहे. मात्र, काटेपूर्णा प्रकल्पाची स्थिती चिंताजनक आहे. गेल्या वर्षी याच दिवशी ९५.७१ टक्के साठा असताना यंदा केवळ २४.१६ टक्के साठा आहे. प्रकल्पाची क्षमता ८६.३५ दलघमी असून सध्या २०.८६ दलघमी साठा शिल्लक आहे..Dam Storage Dharasahiv: धाराशिवमध्ये धरणांतील आटलेल्या पाण्याने टंचाई गडद.बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पातही अत्यल्प साठा आहे. ९३.४० दलघमी क्षमतेच्या या प्रकल्पात सध्या ११.५६ दलघमी म्हणजे १२.३८ टक्के साठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी ९१.२९ टक्के साठा होता. नळगंगा प्रकल्पात ८२.९२ टक्के, तर पेनटाकळी प्रकल्पात ८२.६८ टक्के साठा आहे..पाणीपुरवठ्यासाठी पर्यायांची चाचपणीकाटेपूर्णा प्रकल्पातील साठा २५ टक्क्यांच्या आत असल्याने पावसाचे प्रमाण असेच कमी राहिल्यास प्रकल्प भरण्याची शक्यता धूसर आहे. या प्रकल्पावर अवलंबून अकोला शहरासह ग्रामीण पाणीपुरवठा योजनांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन आमदार रणधीर सावरकर यांनी यंत्रणेसोबत बैठक घेऊन काटेपूर्णाशिवाय इतर प्रकल्पांतून पाइपलाइनद्वारे पाणी आणणे तसेच अन्य पर्यायांवर चर्चा केली. त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत..Dharashiv Water Crisis: पाणीसंकटाचे सावट गडद.पावसाची तूट वाढत चाललीअकोला जिल्ह्यात जून ते सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सरासरी ५९५.३ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असतो. यंदा ३७६.९ मिलिमीटर म्हणजे ६३.३ टक्के पाऊस झाला असून सरासरीच्या तुलनेत २७ टक्के तूट आहे. अकोला, बार्शीटाकळी, पातूर आणि बाळापूर तालुक्यांत सरासरीच्या ६० टक्केसुद्धा पाऊस झालेला नाही. बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ७९.१ टक्के पाऊस झाला असून २१ टक्के तूट आहे. .सरासरी ५५९ मिलिमीटरच्या तुलनेत ४४२.१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. वाशीम जिल्ह्यात सरासरी ६६९.९ मिलिमीटरच्या तुलनेत ४४२.७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. कारंजा तालुक्यात सरासरीच्या ६० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला असून सुमारे ४७ टक्के तूट आहे. पावसाचा खंड कायम राहिल्यास खरीप पिकांसह पिण्याच्या पाण्याचे संकट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.