के. एन. गावंडेगहू पिकाच्या उत्पादनात घट येण्यामागे तणांचा प्रादुर्भाव हे मुख्य कारण ठरते. तणे विविध आवश्यक संसाधनासाठी पिकांशी स्पर्धा करतात.त्यामुळे त्यांचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे असते. त्याच्या नियंत्रणासाठी एकात्मिक पद्धतींचा उदा. प्रतिबंधात्मक पद्धत, यांत्रिकी पद्धती, रासायनिक पद्धत, पीक फेरपालट, जैविक पद्धत यासारख्या विविध पद्धतीचा अवलंब केला पाहिजे..गहू पिकात प्रामुख्याने चांदवेल, रानमेथी, बथूवा, रान मोहरी, कृष्णा नील, रान मटर, काटेमाथ इ. रुंद पानाची तणे आणि काही गवतवर्गीय तणे आढळतात. त्यामुळे पिकांचे ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत नुकसान होते. या तणांचे एकात्मिक व्यवस्थापन सामूहिकरीत्या केल्यास तणांचे प्रभावी नियंत्रण करणे शक्य होते. .Wheat Farming: खानदेशात गहू पीक पेरणी सुरूच .एकात्मिक तण नियंत्रण जमिनीची योग्य प्रकारे मशागत करावी.पेरणीसाठी साफ आणि प्रमाणित बियाण्याचा वापर करावा.वेळेवर पेरणी करावी.अयोग्य खतांचा वापर टाळावा.चांगले कुजलेले, तणांच्या बियाण्यापासून मुक्त असे शेणखत किंवा कंपोस्ट खत वापरावे.अर्धवट कुजलेल्या खताचा वापर टाळावा. त्यातून तणांच्या बियांचा प्रसार होऊ शकतो..योग्य पाणी व्यवस्थापन.योग्य वेळेत आणि योग्य पद्धतीने पिकांचे संरक्षण करणे.पीक फेरपालट करावे.शेताभोवती कुंपणे, बांध यावर वाढणारी तणे फुलोऱ्यात येण्यापूर्वीच काढावीत.पाण्याचे पाट व इतर ओलसर जागा तण मुक्त ठेवाव्यात. रासायनिक तणनाशकांचा आवश्यकतेनुसार योग्य मात्रेत आणि योग्य वेळेवर आवश्यकतेनुसार फवारणी करावी..Weed Control: लव्हाळा तण नियंत्रणाचे कमी खर्चात ४ प्रभावी उपाय.तणनाशकाचा अंश व्यवस्थापन तणनाशकांच्या अति वापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडते. वारंवार व अयोग्य किंवा असंतुलित तणनाशकांच्या वापरामुळे भविष्यात तणनाशक अंश वाढीचा धोका लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. जमिनीमध्ये तणनाशकांचे अंश वाढू नयेत, यासाठी खालील उपाययोजना कराव्यात..योग्य प्रमाणात म्हणजे शिफारशीत मात्रेमध्ये तणनाशकाचा वापर करावा.सतत एकाच तणनाशकांचा वापर टाळावा.पीक फेरपालट करावी.सेंद्रिय खताचा वापर केल्यास जमिनीतील तणनाशकाचे अंश धरून ठेवले जातात. सेंद्रिय खतामुळे जमिनीतील सूक्ष्मजीवांचे प्रमाण सुद्धा वाढते. परिणामी तणनाशकाचे विघटन होण्यास होते..Weed Control: सोयाबीन, कपाशीसाठी तण नियंत्रणासाठी कोणतं तणनाशक वापरावं?.तणनाशके फवारताना घ्यायची काळजी काय करू नये?तणनाशकांची फवारणी जास्त वारा, पावसात, ढगाळ वातावरणात करू नये.तणनाशक हे प्रमाणापेक्षा कमी किंवा जास्त प्रमाणात पाण्यात मिसळू नये.फवारणी करताना धूम्रपान (बिडी/सिगारेट) ओढू नये.जखम असलेल्या व्यक्तीने फवारणी करू नये.तणनाशकामध्ये इतर कोणतेही घटक शिफारशीशिवाय मिसळू नये.मुदत संपलेली तणनाशक वापरू नये.तणनाशकाचा अतिरेक वापर करू नये.नोझल साफ करताना तारेचा वापर करू नये..काय करावे?सर्वप्रथम तणनाशके विकत घेताना अधिकृत विक्रेत्याकडून पावतीसह खरेदी करावी.तणनाशके फवारण्याकरिता एक स्वतंत्र पंप वापरावा.तणनाशकांची फवारणी करताना स्वच्छ पाण्याचा वापर करावा. जेणेकरून चांगले परिणाम मिळतील.जमिनीत योग्य ओलावा असतानाच फवारणी करावी. (वाफशावर असावी.)फवारणी वाऱ्याच्या दिशेने करावी किंवा वाऱ्यांचा वेग कमी असताना करावी.तणनाशकांचे रिकामे डबे व्यवस्थित नष्ट करावेत..तणनाशकांची फवारणी करताना समान वेगाने चालावे.फवारणीसाठी वेगळा पोशाख, बूट, चष्मा, हातमोजे व मास्क वापरावे.तणनाशके हे लहान मुलांपासून व प्राण्यांपासून दूर ठेवावेत.तणनाशक वापरण्यापूर्वी लेबलवर असलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.तणनाशक शिफारस केलेल्या मात्रेनुसार व वेळेनुसार वापरावे.फवारणीसाठी फ्लॅट जेट किंवा फ्लड जेट नोझल वापरावे.फवारणी यंत्राचे व्यवस्थित समायोजन करून घ्यावे.तणनाशक फवारणीनंतर हात-पाय साबणाने चांगले धुऊन घ्यावेत. - के. एन. गावंडे ९५२७३७२५०९(कृषी विद्या विभाग, श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय, पिंपळखुटा, जि. अमरावती).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.