Gose Water Project : गोसे प्रकल्पावर साकारणार जलपर्यटन

भंडारा जिल्ह्यात रोजगार आणि पर्यटनाला वरदान ठरू पाहणाऱ्या गोसे जलपर्यटनाने एक पाऊल पुढे टाकले आहे.
Water Storage
Water StorageAgrowon

Bhandara News : भंडारा जिल्ह्यात रोजगार आणि पर्यटनाला वरदान ठरू पाहणाऱ्या गोसे जलपर्यटनाने एक पाऊल पुढे टाकले आहे. त्या अंतर्गंत जलपर्यटनासाठी गोसेच्या आवश्‍यक ४५० एकर जागेकरिता पर्यटन विभाग आणि जलसंपदा विभाग (Department of Water Resources) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

मुंबईत झालेल्या या कराराच्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार नरेंद्र भोंडेकर उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता, त्यांनी गोसे धरणाला भेट दिली होती.

या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी पर्यटन विभागाच्या माध्यमातून गोसे जल पर्यटनाला तत्काळ मंजुरी देण्याची घोषणा केली होती. काही दिवसांतच या प्रकल्पाकरिता असलेल्या २५० कोटींपैकी पहिला टप्पा म्हणून १०२ कोटी रुपयांना मंजुरी प्रदान करण्यात आली होती.

Water Storage
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर सिंचन

या वाटचालीत आता ४५० एकर जागेसाठी सामंजस्य कराराचीही भर पडली आहे. ही प्रक्रिया येत्या जून महिन्यापर्यंतच पूर्ण करण्यात येणार असून ऑक्‍टोंबर महिन्यात भूमिपूजन करण्याचे नियोजन आहे. हा प्रकल्प लवकर मार्गी लागून विकास व्हावा, अशी या भागातील जनतेची अपेक्षा आहे.

यावेळी माजी विधान परिषद सदस्य परिणय फुके, जलसंपदा विभागाचे अपर सचिव दीपक कुमार, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, विदर्भ पाटबंधारे विभागाचे विभागीय कार्यकारी संचालक राजेंद्र मोहिते, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोश, कार्यकारी संचालक श्रीप्रा बोहरा, प्रकल्प संयोजक सारंग कुळकर्णी व अधिकारी उपस्थित होते.

स्थानिकांना मिळेल रोजगार

गोसे प्रकल्पावर जलपर्यंटनाची उभारणी केली जाणार आहे. या महत्वकांक्षी प्रकल्पातून पर्यटनाच्या हेतूने विकास केला जाणार असल्याने स्थानिकांना रोजगारांची संधी मिळणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com