Water Supply Problem : पाणीपुरवठाप्रश्नी उपोषण तिसऱ्या दिवशी मागे

Protest For Water Supply : उपोषणस्थळी महिला आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी दोन महिन्यांत नळाद्वारे शुद्ध व सुरळीत पाणीपुरवठा न झाल्यास आमदार व खासदार यांना गाव बंदी करू, ग्रामपंचायतीला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला.
Water
Water Agrowon

Nashik News : लासलगाव विंचूरसह १६ गाव पाणीपुरवठा देखभाल दुरुस्ती योजनेच्या मनमानी कारभाराविरुद्ध आणि शुद्ध व सुरळीत पाणीपुरवठ्याच्या मागणीसाठी शिवसेना-शिंदे गटाचे निफाड तालुकाप्रमुख प्रकाश पाटील यांनी महाराष्ट्रदिनापासून लासलगाव ग्रामपंचायतीसमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Minister Dr. Bharti Pawar) यांनी या प्रकरणाची दखल होऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी मंगळवारी (ता. २) चर्चा करून सविस्तर अहवाल व पूर्ण योजनेबाबत माहिती घेऊन दोन महिन्यांत योजना सुरू करून नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याबाबत सूचना केल्या.

डॉ. पवार यांच्या मधस्थीमुळे तिसऱ्या दिवशी पाटील यांनी ५१ तासांपासून सुरू असलेले उपोषण बुधवारी (ता. ३) मागे घेतले.

Water
Mohal Water Supply : नागनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर मोहोळ शहराचा पाणीपुरवठा सुरळीत

बुधवारी मंत्री डॉ. पवार यांचे स्वीय सहायक डॉ. उमेश काळे व जीवन प्राधिकरणचे शाखा अभियंता प्रताप पाटील, शाखा उपअभियंता ए. वाय. निकम, सहायक अभियंता अशोक बिन्नर यांनी सकाळी ११ वाजता लासलगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे भेट दिली.

योजनेची ६ एप्रिल २०२४ पर्यंत कामाची मुदत आहे. त्यापैकी अर्धवाहिनी सहा किलोमीटरपर्यंत बदलणे व जलशुद्धीकरण दुरुस्ती कामे जुलै २०२३ पर्यंत दोन महिन्यांत विनाअडथळा पूर्ण करून नळाद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करून देण्याची व उच्चस्तरीय चौकशी करून कडक कारवाई करून १५ दिवसांत नवीन सचिव नेमू व खंडित नळजोडण्या करण्याच्या सूचना डॉ. पवार यांनी दिल्या.

तसेच लेखी पत्र पाटील यांना दिले. मंडल अधिकारी डी.एस. देवकाते, लासलगाव पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक राहुल वाघ आदी उपस्थित होते.

महिला व तरुण आक्रमक

उपोषणस्थळी महिला आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी दोन महिन्यांत नळाद्वारे शुद्ध व सुरळीत पाणीपुरवठा न झाल्यास आमदार व खासदार यांना गाव बंदी करू, ग्रामपंचायतीला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला.

लासलगावातील युवकांनी समितीचे सचिव तथा ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांना घेराव घातला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना शांत केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com