Water Shortage : मराठवाड्यातील ६४७ गाव-वाड्यांना टँकरने पाणी

Water Scarcity : आठपैकी पाच जिल्ह्यांतील ४९७ गावे आणि १५० वाड्या मिळून तब्बल ६४७ गावांना ७६३ टँकरने पिण्याचे व वापराचे पाणी पुरविण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
Water Shortage
Water ShortageAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati sambhajinagar News : मराठवाड्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत आहेत. आठपैकी पाच जिल्ह्यांतील ४९७ गावे आणि १५० वाड्या मिळून तब्बल ६४७ गावांना ७६३ टँकरने पिण्याचे व वापराचे पाणी पुरविण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यात पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या गाव गाड्यांची संख्या सर्वाधिक आहे.

एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २४० गावे आणि ४५ वाड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरवर अवलंबून रहावे लागत आहे. २०२० ते २०२२ या तीन वर्षांत मराठवाड्यात अतिवृष्टी झाल्याने पाणीपातळी चांगलीच वाढली होती. मात्र गतवर्षी पावसाळ्यात पुरेसा पाऊस न झाल्याने टंचाईचे संकट अधिकच गडद होत चालले आहे.

जानेवारीतच छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यात काही गावांना टॅंकरने पाणीपुरवठ्याची वेळ आली. माहितीनुसार गत ९ जानेवारीला पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गाव वाड्यांना १०९, तर जालना जिल्ह्यात ७६ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत होता.

Water Shortage
Water Scarcity : राज्यात १४१७ टँकरने पाणीपुरवठा सुरू

टँकरची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. २१ फेब्रुवारी रोजी ही संख्या तब्बल ३१९ वर पोहोचली होती. आता मार्च महिना संपण्यापूर्वीच उन्हाचा चटका वाढला आणि तहानलेल्या गावांची संख्याही वाढली आहे. मंगळवारपर्यंतच्या (ता. २६) अहवालानुसार मराठवाड्याच्या पाच जिल्ह्यांत ६४७ गावांमध्ये ७६३ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

सर्वाधिक ३८५ टँकर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू आहेत. त्यापाठोपाठ जालना जिल्ह्यात २३५ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. धाराशिवमध्ये ४२, बीडमध्ये ९३ तर लातूरमध्ये ८ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. इतर चार जिल्ह्यांत सध्यातरी पाणीटंचाई जाणवत नाही. मात्र त्या जिल्ह्यातही भविष्यात टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ येऊ शकते.

११०९ विहिरींचे अधिग्रहण

सध्या आठही जिल्ह्यातील १ हजार १०९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २०५, जालना २५१, परभणी १३, बीड १०१, नांदेड ३, लातूर ११० तर धाराशिव जिल्ह्यात ४२० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले.

यामध्ये टँकरसाठी ३६१ तर टँकर व्यतिरिक्त ७४८ अशा ११०९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. टँकर व्यतिरिक्त पाणीपुरवठा करण्यासाठी धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक तर नांदेड जिल्ह्यात सर्वात कमी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

Water Shortage
Water Scarcity : जनावरं जगवायला तरी पाणी सोडा

...या तालुक्यात भीषण टंचाई

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण, वैजापूर, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री, सिल्लोड व कन्नड या तालुक्यांमध्ये अनुक्रमे पाणीटंचाईची स्थिती भीषण होत चालली आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन, बदनापूर, घनसांगवी, जालना, अंबड, जाफराबाद या तालुक्यांमध्ये पाणीटंचाई अधिक तीव्र झाली आहे. बीड जिल्ह्यातील बीड, गेवराई, पाटोदा, आष्टी तालुक्यांमध्ये पाणीटंचाईने चांगलेच डोके वर काढले आहे. लातूर जिल्ह्यातील औसा, अहमदपूर तसेच धाराशिव जिल्ह्यातील भूम, कळंब, उमरगा, लोहारा या तालुक्यांमध्ये पाणीटंचाई झपाट्याने वाढत चालली आहे.

जिल्हानिहाय टंचाईग्रस्त

गाव-वाड्यांची संख्या

जिल्हा गाव वाड्या

छ. संभाजीनगर २४० ४५

जालना १४८ ५५

बीड ८० ५०

लातूर ०७ --

धाराशिव २२ --

टँकर व्यतिरिक्त पाणीपुरवठासाठी

अधिग्रहित विहिरींची संख्या

छत्रपती संभाजीनगर ७९

जालना ५०

परभणी १३

हिंगोली ०६

नांदेड ०३

बीड ८९

लातूर ११०

धाराशिव ३९८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com