Water Stock : नांदेडमधील पाणीसाठा ५३ टक्क्यांपर्यंत

जिल्ह्यात चालू वर्षी पावसाळ्यात झालेल्या दमदार पावसामुळे संपूर्ण प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा झाला होता.
Water Stock
Water Stock Agrowon
Published on
Updated on

Nanded News : जिल्ह्यात सध्या कमाल तापमानात वाढ झाल्याने पाण्याचे बाष्पीभवन वाढले आहे. यासह शेतीसिंचनासाठी (Agriculture Irrigation) पाणी सोडण्यात येत असल्यामुळे जिल्ह्यातील पाणीसाठ्यात (Water Stock) झपाट्याने घट होत आहे.

सध्या एकूण १०४ प्रकल्पात ३९१.६३ दशलक्ष घनमीटरनुसार ५३.७९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच कालावधीत ४८५.८७ दलघमीनुसार ६६.७३ टक्के पाणीसाठा होता, अशी माहिती नांदेड पाटबंधारे विभागाकडून (Irrigation Department) देण्यात आली.

जिल्ह्यात चालू वर्षी पावसाळ्यात झालेल्या दमदार पावसामुळे संपूर्ण प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा झाला होता. यंदा जुले महिन्यात ६०६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. परिणामी सर्वच नद्यांना पूर आला होता.

यामुळे जिल्ह्यातील सर्वच १०४ प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. परंतु या उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. तसेच शेतीसिंचनासाठी पाणी पाळ्या देण्यात येत असल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे.

Water Stock
Parbhani Water Shortage : लघु प्रकल्पातील ८ टक्के, मध्यम प्रकल्पातील ७ टक्के पाणीसाठा घटला

आजघडीला जिल्ह्यात मोठा प्रकल्प असलेल्या विष्णुपुरी प्रकल्पात सध्या प्रकल्पात ३९.०१ दलघमीनुसार ४८.२९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर दुसरा मोठा प्रकल्प असलेल्या मानार (बारुळ) प्रकल्पात ८१.९८ दलघमीनुसार ५९.३२ टक्के पाणीसाठा आहे.

यासोबतच जिल्ह्यातील नऊ मध्यम प्रकल्पात ७७.८२ दलघमीनुसार ५५.९६ टक्के पाणीसाठा आहे. चार कोल्हापुरी बंधाऱ्यात ०.३२ दलघमीनुसार ४.२५ टक्के पाणीसाठा आहे, ८० लघू प्रकल्पात ८२.३८ दलघमीनुसार ४७.६७ टक्के पाणीसाठा आहे.

नऊ उच्च पातळी बंधाऱ्यात ११०.१२ दलघमीनुसार ५८.०२ टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यात एकूण १०४ प्रकल्पात ३९१.६३ दशलक्ष घनमीटरनुसार ५३.७९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

यासोबतच नांदेड जिल्ह्याशेजारी असलेल्या परभणी जिल्ह्यातील येलदरी प्रकल्पात ६७७.४४ दलघमीनुसार ८३.६६ टक्के पाणीसाठा आहे. तर सिद्धेश्‍वर प्रकल्पात १५.१४ दलघमीनुसार ५१.१४१८.७० टक्के पाणीसाठा आहे, अशी माहिती नांदेड पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.

Water Stock
Irrigation Projects : अकोला जिल्ह्यात अनेक प्रकल्पांत पाणी असूनही शेतीसाठी उपयोग नाही

नांदेड पाटबंधारे मंडळातील प्रकल्पनिहाय पाणीसाठा

प्रकल्प - दलघमी - टक्केवारी

विष्णुपुरी ३९.०१ ४८.२९

मानार ८१.९८ ५९.३२

मध्यम प्रकल्प (९) - ७७.८२ ५५.९६

लघू प्रकल्प (८०) - ८२.३८ ४७.६७

उच्चपातळी बंधारे (९) - ११०.१२ ५८.०२

को.प.बंधारे (चार) ०.३२ ४.२५

एकूण प्रकल्प ३९१.६३ ५३.७९

जिल्ह्याशेजारील प्रकल्प

येलदरी ६७७.४४ ८३.६६

सिद्धेश्‍वर १५.१४ १८.७०

इसापूर ७०७.६८ ७३.४०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com