Drought Condition : नाशिक अहमदनगरकरांच्या घशाला कोरड; टँकरची मागणीही वाढली

Water Crisis : राज्यात तापमानचा पारा चाळीशी जवळ पोहचला आहे. यामुळे ग्रामीण भागात नागरिकांच्या हंडाभर पाण्यासाठी राणावणात वणवण फिरण्याची वेळ आली आहे.
Drought Condition
Drought Conditionagrowon

Pune News : राज्यात उन्हाची तीव्रता वाढली असून अनेक ठिकाणी पारा ४० अंशाच्या जवळ पोहचला आहे. यामुळे राज्यातील प्रमुख धरणांसह विहिरी, तलावं, कुपनलिकांनी तळ गाठला आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यासह चाऱ्यासाठी नागरिकांवर राणावणात वणवण फिरण्याची वेळ आली आहे. यादरम्यान नाशिक अहमदनगरकरांच्या घशाची कोरड वाढली आहे. यामुळे रहिवाशांकडून टँकर वाढवण्याची मागणी होत असून एका दिवसात अहमदनगरमध्ये ६ टँकरची वाढ झाली आहे. सध्या नाशिक आणि अहमदनगरमध्ये अनुक्रमे २५५ आणि १८७ टँकर रहिवाशांची तहान भागवत आहेत.

जलस्रोतांनी तळ गाठला

वाढते तापमानामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. एप्रिलमध्येच कमाल तापमान चाळीशीपार गेल्याने पिकांनी माना टाकल्या आहेत. ग्रामीण भागातील विहिरी, तळी, तलावांसारखी जलस्रोत तळ गाठत आहेत. यामुळे पिण्यासह वापराच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. तर जनावरांच्या चाऱ्यापाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अनेक गावातील महिला वर्गाला हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

धरणातील पाणीसाठा

जलसंपदा विभागाच्या गुरूवारी (ता. १८) प्रसिद्ध झालेल्या धरणातील पाणीसाठ्याच्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील मोठ्या २२ धरणातील पाणीसाठा ३३.५२ टक्के आहे. मध्यम ५४ धरणांमध्ये आज ४१.३२ पाणीसाठा असून जिल्ह्यातील ४६१ लघू प्रकल्पात २५.९२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून सर्व धरणातील पाणीसाठा हा ३३.८० टक्के शिल्लक आहे. दरम्यान अहमदनगर जिल्हातील भंडारदरा, मुळा आणि निळवंडे या धरणांमध्ये अनुक्रमे ३८.०३, २७.८२ आणि २३.०६ टक्के उपयुक्त पाणीसाठा राहिला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील स्थिती

अहमदनगर जिल्ह्यात ७ महसूल विभाग आणि १४ तालुक्यांमध्ये पाणीटंचाई आहे. जिल्ह्यातील सुमारे १८८ गावे ९७६ वाड्यावस्त्यांना १४ सरकारी आणि १७३ खाजगी अशा १८७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

नाशिक जिल्ह्यात गंभीर पाणीटंचाई

तसेच नाशिक जिल्ह्यात देखील गंभीर पाणीटंचाई असून येथील १५ तालुक्यातील २३३ गावे आणि ५३० वाड्यांमधील ७६३ ठिकाणी २५५ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. यामध्ये सर्वाधिक टँकर हे खाजगी आहेत. तर ५६२ फेऱ्यांमधून ४ लाख ८० हजार १३६ लोकांना पाणी दिले जात आहे.

येवल्यात पाण्याचे दुर्भिक्ष

तर या पाठोपाठ येवल्यात पाण्याचे दुर्भिक्ष असून येथील ५२गावे २५ वाड्यावस्तांमधील ७७ हजार ४०७ लोकसंख्या ४५ टँकरवर सध्या अवलंबून आहे. तर मालेगांवातही स्थिती सध्या गंभीर असून येथे ३६ टँकरने ३५ गावे ७२ वाड्यावस्तांना पाणी पुरवले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com