
Chhatrapati Sambhajinagar : मागील त्याला शेततळे या योजनेप्रमाणेच पाण्याची बचत करणाऱ्या तंत्रज्ञानाची किंवा सिंचनना संबंधित योजना अमलात आणायला हव्यात, असे मत मृद व जलसंधारण विभागाचे आयुक्त, वाल्मिचे महासंचालक व पाणलोट विकास कार्यक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर राजे अर्दड यांनी व्यक्त केले.
राज्य शासनाच्या जलसाक्षरता उपक्रमाप्रमाणेच दरवर्षी जलजागृती सप्ताहाचे आयोजन 16 ते 22 मार्च दरम्यान संपूर्ण राज्यात केली जाते.
यादरम्यान लोकांना पाण्याविषयी महत्त्वाची माहिती देऊन त्यांच्या सहभागाने जनजागृती आणण्यासाठी विविध तांत्रिक सांस्कृतिक शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
वाल्मीतर्फे या निमित्ताने जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी श्री अर्दड बोलत होते.
श्री अर्दड म्हणाले, की उन्हाळा आला की आपण पाणी वाचवा, पाण्याची बचत करा, पाण्याचा अपव्य होऊ देऊ नका, असा आविर्भाव निर्माण करतो. परंतु पाण्याच्या वापराबाबत आपल्यात व्यवहार परिवर्तन होत नाही. ते घडवून आणायचे मोठे काम आपल्याला करावे लागणार आहे.
कमी पाण्यात पण भागविता येते असा विचार कायम करून त्यावर समाजात परिवर्तन घडवून आणावी लागेल. वाल्मीमध्ये 16 मार्चपासून सुरू झालेल्या जनजागृती सप्ताहात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे.
युवा जलसाक्षरता अंतर्गत अभियांत्रिकी व कृषी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सोबतच पाणी आणि स्वच्छता या विषयावर चित्रकला रांगोळी स्पर्धा आणि पाण्यासाठी धाव अशा सूचक कार्यक्रमाची आयोजित करण्यात आले आहेत.
यंदाच्या वर्षी जागतिक जलदिनानिमित्त 22 मार्च रोजी पाणी आणि स्वच्छता या विषयांवर समाजात व्याप्त गैरसमज दूर करणे या विषयांवर आधारित जागतिक जलदिन साजरा केला जाणार असल्याची माहिती यावेळी डॉ. राजेश पुराणिक यांनी दिली.
उद्घाटन सत्रात वाल्मिचे डॉ. गरुडकर, डॉ. विजय बोडखे, डॉ. पराग भागवत, श्री. सोनार यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.