
Nashik News : जलसंपदा विभागाच्या पालखेड पाटबंधारे विभागाने ३१ मार्च २०२५ अखेर सिंचन व बिगर सिंचन पाणीपट्टी वसूल करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात १६७५.७८ लाख रुपये वसुलीचे उद्दिष्ट असताना २२६३.८९ लाख रुपयांची म्हणजेच एकूण १३५.०८ टक्के वसुली झाल्याची माहिती पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत यांनी दिली.
पाणीपट्टी आकारणी व वसुली हा जल व्यवस्थापनाचा एक भाग मानला जातो. यंदा पालखेड विभागाने आतापर्यंतची विक्रमी सिंचन व बिगर सिंचन पाणीपट्टी वसुली केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून १०० टक्के पाणीपट्टी वसुली होत आहे. यंदा सिंचनासाठी उद्दिष्टपूर्तीचा आकडा १०० टक्के गाठण्यात यश आले आहे. तर बिगर सिंचन वसुली गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने शंभर टक्क्यांवर होत आहे.
पाणीपट्टी वसुली होण्यासाठी पालखेड विभागाच्या सर्वच कार्यालयांतील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. ज्यामध्ये सर्व उप विभागीय अभियंते, शाखाधिकारी, कालवे निरीक्षक, दप्तर कारकून, मोजणीदार, विभाग व उपविभागातील सर्व कर्मचाऱ्यांचा सहभाग राहिला आहे.
पालखेड पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता अभिजित रौंदळ, शाखा अभियंता सी. आर. शिंदे, तसेच सिंचन शाखा प्रमुख विकास अहिरे व त्यांची सहकाऱ्यांचे प्रयत्न होते. उपविभागीय अभियंता प्रशांत गोवर्धने, नीलेश वन्नरे, प्रवीण पवार, विश्वास चौधरी यांनी प्रयत्न केले.
हे आहेत प्रमुख ग्राहक
उर्ध्व गोदावरी प्रकल्प: पालखेड पाटबंधारे विभाग अंतर्गत असलेल्या ओझरखेड, करंजवन, पालखेड, वाघाड, तिसगाव व पुणेगाव प्रकल्प व त्यावरील कालवे, तसेच शासनमान्य पिण्याच्या पाण्याच्या संस्था जसे, ३८ गाव पाणी वापर योजना, येवला नगरपरिषद, मनमाड नगरपरिषद, मनमाड रेल्वे, लाभक्षेत्रातील ग्रामपंचायती, जिल्हाधिकारी यांचे आकस्मिक आरक्षणातील पिण्याच्या पाण्याचे बंधारे व लाभ क्षेत्रात स्थापन झालेल्या पाणी वापर संस्था तसेच दिंडोरी निफाड व येवला तालुक्यातील औद्योगिक वसाहत, खासगी कंपन्या, कादवा साखर कारखाना, रानवड साखर कारखाना आदी.
२०२४-२५ वर्षातील वसुलीचा तपशील (आकडे लाखात)
तपशील उद्दिष्ट साध्य टक्केवारी
सिंचन १२२.६८ १५३.१६ १२४.८५
बिगर सिंचन १५५३.१० २११०.५० १३५.८९
एकूण १६७५. १८ २२६३.६ १३५.०८
गेल्या सहा वर्षांतील वसुली (आकडे लाखात)
वर्ष उद्दिष्ट साध्य टक्केवारी
२०१९-२० १६५२.२७ ११९९.८६ ७३
२०२०-२१ १६४७.७८ १५६१.२१ ९५
२०२१-२२ १८९१.८३ १५१९.१८ ८०
२०२२-२३ १६४८.८४ १७३९.८८ १०६
२०२३-२४ १२१७.४५ १७६३.७५ १४५
२०२४-२५ १६७५.७८ २२६३.६६ १३५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.