
Sangli News : गेली तीन-चार दिवस गोंधळ घातल्यानंतर अखेर कोयना धरण व्यवस्थापनाने कृष्णा नदीत एक टीएमसी पाण्याचा विसर्ग सुरू केला. प्रारंभी १०५० आणि सायंकाळी २१०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे कृष्णा नदीकाठच्या शेतकरी, सहकारी उपसा सिंचन योजनांना दिलासा मिळाला आहे.
बहे बंधाऱ्यापासून पुढे सांगली जिल्ह्याच्या हद्दीत कृष्णा नदी कोरडी पडली आहे. बंधाऱ्यांनी तळ गाठला आहे. जॅकवेल उघड्या पडल्या आहेत. नदीत पाणी सोडावे, यासाठी सर्व स्तरांतून प्रयत्न सुरू होते. मात्र कोयना धरण व्यवस्थापनाकडून प्रतिसाद मिळत नव्हता. पाणी नियोजन समिती बैठकीचे त्याला कारण दिले जात होते.
पालकमंत्री सुरेश खाडे यांनी जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी शिर्डीत आणि आमदार अनिल बाबर यांनी साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराजे देसाई यांच्याशी फोनवरून चर्चा केली. श्री. बाबर यांनी परिस्थिती गंभीर असल्याने आता चालढकल कराल, तर अडचणी वाढतील, असा इशारा दिला.
त्याच वेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय नेत्यांनी ठिय्या, काँग्रेसने निदर्शने, तर राष्ट्रवादीने धरणे आंदोलन केले. सांगलीतून दाव वाढल्यानंतर कोयना धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
कोयणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने कृष्णा काठ नदी काठच्या गावांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचप्रमाणे टेंभू, ताकारी आणि खासगी, सहकारी उपसा सिंचन योजनांना पुरेसे पाणी मिळणार असल्याने या योजना सुरू करण्यास अडचणी कमी होईल.
तांत्रिक गोंधळाची माहिती घेईन ः जिल्हाधिकारी
याआधी पाटबंधारे विभागाने मागणी पाठवली, की कोयनेतून पाणी सोडले जात होते. त्यात पालकमंत्र्यांचा हस्तक्षेप कधीच नव्हता. आता साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई हस्तक्षेप करत असल्याचा मुद्दा प्राधान्याने चर्चेत आला आहे. त्याबाबत मी माहिती घेईन, प्रक्रिया अधिक समजून घेईन, असे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.