Canal Water : ‘पालखेड’वरील लाभार्थ्यांचे पाणी अडचणीत

दिंडोरी, निफाड, येवला व नांदगाव तालुक्यांना वरदान ठरणाऱ्या पालखेड डावा कालव्याला पालखेड-करंजवण धरणातून पाणी सोडले जाते.
Water Canal Issue
Water Canal IssueAgrowon
Published on
Updated on

अण्णासाहेब बोरगुडे

Niphad News : दिंडोरी, निफाड, येवला व नांदगाव तालुक्यांना वरदान ठरणाऱ्या पालखेड डावा कालव्याला पालखेड-करंजवण धरणातून (Palkhed-Karanjavan Dam) पाणी सोडले जाते. परिसरातील शेतीसह पिण्याच्या पाण्याचा आवर्तन पद्धतीने पालखेड डावा कालव्याद्वारे (Canal) पुरवठा (Water Supply) केला जातो;

मात्र मनमाड शहरासाठी करंजवण धरणातून जलवाहिनीच्या प्रस्तावित योजनेला महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे; मात्र योजनेमुळे पालखेड डावा कालव्यावर अवलंबून लाभधारकांचे पाणी अडचणीत येण्याची भीती आहे. तर शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

करंजवण-मनमाड जलवाहिनी शासकीय योजना पूर्ण करण्यापूर्वी पालखेड डावा कालव्यालगतच्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणीवाटप प्रणालीत बदल करत कालव्यावर अवलंबून शेतकऱ्यांसाठी पाणी आरक्षित करणे आवश्यक आहे.

त्यांना उचल पाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. करंजवण-मनमाड पाइपलाइन झाली तर त्यानिमित्ताने पालखेड डावा कालव्याला येणारे सिंचनाचे व पिण्याच्या पाण्याचे आवर्तन बंद होईल, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.

Water Canal Issue
Solapur Ujani Canal : कालवा फुटीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू

प्रस्तावित पाइपलाइनच्या कामाला सुरुवात होणार आहे. पण त्यामुळे पालखेड डावा कालव्यावरील लाभार्थी शेतकरी अडचणीत येणार नाहीत ना, असा प्रश्न निर्माण होत आहे.

निफाडचे आमदार दिलीप बनकर व येवल्याचे आमदार माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शासनाकडे दाद मागितल्याशिवाय कालव्याचे आरक्षण पूर्वीप्रमाणेच राहील की नाही, याची खात्री नाही.

कालव्याच्या लाभार्थ्यांचा विचार करावा

सध्या तरी पालखेड डावा कालव्याच्या लाभधारकांमध्ये जनजागृती होणे महत्त्वाचे आहे. याबाबत लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पालखेड डावा कालव्यावरील पाण्याचे आरक्षण पूर्वीप्रमाणेच ठेवावे, अशी मागणी केली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र बोरगुडे यांनी दिली.

मनमाड-करंजवण पाइपलाइन होण्यासाठी प्रयत्नशील असलेले आमदार सुहास कांदे हे निफाड तालुक्यातीलच असल्याने त्यांनीही पालखेड डावा कालव्याच्या लाभार्थ्यांचा विचार करून पाण्याचे आरक्षण पूर्वीप्रमाणेच ठेवून पालखेड डावा कालव्यावरील लाभार्थी शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षण कायम ठेवावे.

पालखेड डावा कालव्यावरील पाण्याचे आरक्षण कमी झाले तर हजारो शेतकऱ्यांच्या शेती सिंचनाचा प्रश्न निर्मान होईल. या करिता निफाड, दिंडोरी, येवला तालुक्यांतील लोकप्रतिनिधींनी जागृत होण्याची गरज आहे.
लक्ष्मण गवारे, शेतकरी, रामपूर, ता. निफाड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com