Sangli Drought : दुष्काळासाठी सुरू योजनांच्या आवर्तनाचे पाणी मुरले कुठे?

Sangli Water Issue : गेल्या महिन्यात सर्वदूर पाऊस झाला. पण सांगली जिल्ह्यात हा पाऊस अपुरा आहे. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यातील खानापूर, तासगाव, आटपाडी, कवठे महांकाळ आणि जत तालुक्यात पाणी टंचाई निर्माण झाली.
Takari irrigation
Takari irrigation Agrowon
Published on
Updated on

Sangli News : दुष्काळी भागातील गावांचा पिण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी टेंभू व म्हैसाळ आणि ताकारी योजनेतून पाण्याचे आवर्तन सुरू केले आहे. या योजनेतून दुष्काळी पट्ट्यातील पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी तलाव भरण्याचे आदेश शासनाने दिले.

ही आवर्तने सुरूही आहेत, मात्र या योजनांतून लाभ क्षेत्रातील तलावच भरले नाहीत. त्यामुळे योजनेचे सुरू असलेले पाणी नक्की कोठे मुरत आहे, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.

Takari irrigation
Water Agreement : कर्नाटकचे पाणी जतला देऊ पण... ; डी. के. शिवकुमारांची महाराष्ट्रासोबत कराराची तयारी

सांगली जिल्ह्यात गेल्या महिन्यात सर्वदूर पाऊस झाला. पण हा पाऊस अपुरा आहे. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यातील खानापूर, तासगाव, आटपाडी, कवठे महांकाळ आणि जत तालुक्यात पाणी टंचाई निर्माण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजना सुरू करण्यासाठी आंदोलने केली.

परंतु त्याकडे पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केले. यामुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीदेखील शेतकऱ्यांची मागणी उचलून धरली. पाटबंधारे विभागाची बैठक घेऊन योजना सुरू करण्याचे आदेश दिले. म्हैसाळ, टेंभू आणि ताकारी योजना टप्प्याटप्प्याने सुरू झाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा दिसाला मिळाला.

Takari irrigation
Jat Border Issue : जत तालुक्यात पाणी, सीमा प्रश्न पुन्हा पेटला

वास्तविक, या योजना सुरू होऊन महिन्याचा काळ पूर्ण होईल. परंतु या योजनेच्या मुख्य आणि पोटकालव्यांतूनच पाणी पुढे वाहत जात आहे. कवठे मंहाकाळ तालुक्यातील कोकळे गावाच्या लगत म्हैसाळचा पोटकालवा आहे.

पोट कालव्याला मातीचा बांध घालून हे पाणी रस्त्यावर वाहत आहे. मात्र, याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे पुढे पाणी कसे मिळणार, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

तिन्हीही योजना सुरू आहेत. पुरातून वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागात देण्याचे व त्यातून या भागातील तलाव भरण्याच्या सूचना जलसंपदा विभागाकडून देण्यात आल्या. परंतु मुख्य आणि पोटकालव्यातूनच पाणी जात आहे.

याचा फारसा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. हे पाणी या तिन्हीही योजनांच्या लाभ क्षेत्रातील तलावात भरून दिले तर, भविष्यातील पाण्याची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे. परंतु जलसंपदा विभागाकडून तलाव भरून देण्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने योजनांचे सुरू असलेले पाणी कुठे मुरते, असा प्रश्न आता शेतकरी करू लागले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com