Jaldoot Farmer : शेतकरी जलदूत झाल्यामुळे जलसाक्षरता चळवळ सुरू

पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.हे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून देण्यासाठी खरपुडी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून पडणाऱ्या पावसाचे पाणी मोजण्याचे काम चार गावांत सुरू केले गेले.
Jaldoot Farmer
Jaldoot FarmerAgrowon
Published on
Updated on

जालना : पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण (Importance Of Water) आहे.हे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून देण्यासाठी खरपुडी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून पडणाऱ्या पावसाचे पाणी मोजण्याचे काम (Rainwater Harvesting) चार गावांत सुरू केले गेले. सुरू झालेली जलसाक्षरतेची चळवळ (Movement Of Water Literacy) आता जवळपास वीस गावांत पोहोचली आहे. त्याचा थेट लाभ शेतकऱ्यांना आपल्या शेतीचे नियोजन (Agriculture Management) करण्यात होत असल्याची बाब प्रकर्षाने पुढे आली आहे.

Jaldoot Farmer
Water Scarcity: पाण्याच्या अतिरिक्त वापरावर बसणार दंड

खरपुडी कृषी विज्ञान केंद्राची स्थापना झाल्यापासून पर्जन्यमापकाची नोंद केंद्राने ठेवलेली आहे. साधारणतः १९९५ मध्ये खरपुडी कृषी विज्ञान केंद्राचे प्रकल्प संचालक तथा मराठवाडा शेती साह्य मंडळाचे विश्‍वस्त विजय अण्णा बोराडे यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांना जलसाक्षर करण्यासाठी पडणाऱ्या पावसाचे मोजमाप करण्याचे काम कडवंची असरखेडा शिवनी व भूतखेडा या चार गावांत पर्जन्यमापक बसवून सुरू करण्यात आले.

Jaldoot Farmer
West Water Management : कळंबासह तीन गावांत सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प

कडवंची, (४ पर्जन्यमापक), असरखेडा, शिवणी, भूतखेडा, नंदापूर, कडेगाव, वरुडी, बाजारगेवराई, बाहेगव्हाण, पळसखेडा पिंपळे, भाटेपुरी, पुनेगाव, डोनगाव, शिराळा, पोखरी, निवडूंगा, नेर, वखारी, वडगाव, वरूड अशी जिल्ह्यातील अनेक गावे आहेत. साधारणपणे कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये २५ ते ३० जलसाक्षर स्वयंसेवक तयार करून पाणी मोजण्यास सुरुवात केलेली आहे. यामध्ये आपलाही खारीचा वाटा उचलत प्रयोगशील शेतकरी उद्धवराव खेडेकर यांनीही मोसा (ता. मंठा) गावाला स्वखर्चातून पर्जन्यमापक यंत्र देऊन केव्हीके खरपुडीच्या जलसाक्षरतेच्या चळवळीत योगदान देण्याचे काम केले आहे.

ग्राम पातळीवर पर्जन्यमापकाचे महत्त्व अवर्षण प्रवण भाग असल्यामुळे सर्व शेती पर्जन्यआधारित आहे. पडणारा पाऊस हा नैॡत्य मोसमी आधारित आहे. शेती मोसमी पावसावर अवलंबून आहे. एकूण पाऊस आणि त्यावर पीक नियोजन त्यासाठी पावसाची नोंद ठेवणे आवश्यक आहे. जलचळवळीतील महत्त्वाचे... पर्जन्यमापकाच्या साह्याने गाव पातळीवर पाण्याचा ताळेबंद करणे म्हणजे त्या शिवारावर पडलेल्या पर्जन्यमानाचा (पावसाचा) हिशेब लावणे झाले सोपे.

गावाच्या शिवारावर पडलेल्या एकूण पावसाच्या पाण्यातून, बाष्पीभवनातून जाणारे पाणी, वाहून जाणारे पाणी, मुरलेले भूगर्भातील पाणी, मातीतील ओलावा व पिकाला लागणारे पाणी याचा हिशेब. प्रत्येक शेतकऱ्याला व गावातील सर्व लोकांना जलसाक्षर करणे झाले सुरू. खरीप व रब्बी पिकाचे नियोजन, उन्हाळी पिकाचे नियोजन, पावसातील खंडातील नियोजन व दुष्काळी वर्षी पिकाचे नियोजन पर्जन्यमापकाद्वारे करता येण्यास होते आहे मदत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com