Ujani Water Stock : उजनीत १० हजार क्युसेकची आवक

Ujani Dam : पावसाळा सुरू झाल्यानंतर २० जुलैपर्यंत उजनी धरण उणे पातळीतच होते. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे उजनीत मोठी पाणी आले.
Ujani Dam Water
Ujani Dam Wateragrowon
Published on
Updated on

Solapur News : उजनी ओव्हरफ्लो असून धरणात सध्या १२० टीएमसी (१०४ टक्के) पाणी आहे. धरणात दौंडवरून १० हजार क्युसेकची आवक असून उजनीतून १५ हजार क्युसेकचा विसर्ग भीमा नदीत सोडण्यात येत आहे. तर बोगदा, कॅनॉल, उपसा सिंचन योजनांसह धरणावरील विद्युत प्रकल्पासाठी देखील धरणातून पाणी सोडण्यात येत आहे.

पावसाळा सुरू झाल्यानंतर २० जुलैपर्यंत उजनी धरण उणे पातळीतच होते. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे उजनीत मोठी पाणी आले. अवघ्या १५ दिवसांत धरण ओव्हरफ्लो झाले. चार ऑगस्टपासून धरणातून भीमा नदीत पाणी सोडून देण्यास सुरवात झाली.

Ujani Dam Water
Ujani Dam : ‘उजनी’च्या पाण्यावर २२ दिवसांत ६६ लाख युनिट वीजनिर्मिती

पावसाळा अजून महिनाभर असतानाच उजनी धरणातून तब्बल ७० टीएमसी पाणी नदीतून सोडून देण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून धरणातून ६ ऑगस्टपासून कॅनॉलमधूनही पाणी सोडले जात आहे.

Ujani Dam Water
Ujani Dam : ‘उजनी’तून भीमेत विसर्ग वाढवला

यंदाच्या उन्हाळ्यात एकरूख, देगावसह काही उपसा सिंचन योजना कार्यान्वित होतील. धरण ओव्हरफ्लो असल्याने नव्याने कार्यान्वित होणाऱ्या उपसा सिंचन योजनांसाठी देखील पाणी सोडणे शक्य होणार आहे.

भीमा नदीकाठी दोनदा पूरस्थिती

यंदाच्या पावसाळ्यात ऑगस्टमध्येच भीमा नदी काठावर दोनदा पूरस्थिती निर्माण झाली होती. पुणे जिल्ह्यातील सर्व धरणे भरल्याने वीर धरणातूनही मोठा विसर्ग सोडण्यात आला होता. याशिवाय उजनी धरणातूनही एक लाखांहून अधिक क्युसेकचा विसर्ग भीमा नदीत सोडण्यात आला होता. त्यामुळे पंढरपूरजवळील झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरले होते. पण, जलसंपदा विभागाच्या सतर्कतेमुळे मोठा विसर्ग पंढरपूर येथे आला नाही आणि त्यामुळे मोठ्या पुराची स्थिती निर्माण झाली नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com