Umte Dam : उमटे धरणातून दोन दिवसाआड पाणी

Water Level : उमटे धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्‍याने गाळयुक्त पाण्याचा नागरिकांना पुरवठा होत आहे.
Water Shortage
Water Shortage Agrowon
Published on
Updated on

Alibaug Water News : उमटे धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्‍याने गाळयुक्त पाण्याचा नागरिकांना पुरवठा होत आहे. धरणातून दोन दिवसाआड पाणी पुरवठा सुरू करण्यात आल्‍याने लगतच्या गावांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्‍या आहेत.

दिवसेंदिवस जिल्‍ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्‍न गंभीर होत असून आणखी महिनाभर हीच परिस्‍थिती राहणार असल्‍याने गाव-पाड्यांतील नागरिक चिंतेत आहेत.

उमटे धरणातून ६३ गावे, वाड्यांमधील साधारण ४२ हजारांहून अधिक नागरिकांची तहान भागवली जाते. धरणातील पाण्यावर तालुक्यातील ४० टक्के गावे अवलंबून आहेत. यंदा पाऊस समाधानकारक झाला असला तरी जिल्‍ह्यातील काही गावांत जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच पाणी टंचाईची जाणवू लागली आहे.

धरणात साचलेल्या गाळामुळे साठवण क्षमता कमी झाली आहे. त्‍यात वाढत्या उष्णतेमुळे धरणाची पातळी दिवसेंदिवस आणखीखालावली आहे.

Water Shortage
Pune Water Shortage : पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या

उमटे धरणावर अवलंबून असलेल्या ६३ गावांमध्ये सध्या पाणी संकट ओढावले आहे. धरणात पाणी कमी आणि गाळ जास्त असल्‍याचा फटका नागरिकांना बसतो आहे.

पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने दोन दिवसआड पाणी पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. २ मेपासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली असून बोरघर, रामराज, सुडकोली, चिंचोटी, बेलोशी, खानाव, वरंडे, रेवदंडा, चौल, आक्षी, नागाव या ११ तालुक्यातील ग्रामपंचायतींना लेखी पत्र देण्यात आले आहे.

त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी दोन दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. याशिवाय ग्रामपंचायतींनाही दवंडी देण्याच्या सूचना केल्‍या आहेत.

धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. पाणीटंचाई टाळण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. दर दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. पाणी कमी येत असल्याने पाणी उकळून व गाळून प्यावे. याबाबत दवंडीद्वारे नागरिकांना माहिती देण्याचे पत्र ग्रामपंचायतींनाही दिले आहे.
अनिकेत पाटील, उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा, अलिबाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com