Poultry Management : ब्रॉयलर कोंबड्यांचे पाणी, खाद्य व्यवस्थापन

Chicken Poultry Management : उन्हाळ्यामध्ये शरीरातील ऊर्जेचा ऱ्हास होतो, त्यामुळे कोंबड्या सतत पाणी पितात. यामुळे उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या भांड्यांची संख्या पंचवीस ते तीस टक्‍क्‍यांनी वाढवावी.
Poultry
PoultryAgrowon

डॉ. एस.आर.शेख, डॉ. सिद्दीकी एम.एफ.एम.एफ.

Poultry Farming : उन्हाळ्यामध्ये शरीरातील ऊर्जेचा ऱ्हास होतो, त्यामुळे कोंबड्या सतत पाणी पितात. यामुळे उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या भांड्यांची संख्या पंचवीस ते तीस टक्‍क्‍यांनी वाढवावी.

उन्हाळ्यात कोंबड्या कमी धान्य खातात. त्यामुळे आहारात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे प्रमाण जास्त ठेवावे. जेणे करून कमी खाल्ल्यानंतरही कोंबडीला आवश्यक ते सर्व घटक मिळतात.

पाणी व्यवस्थापन

कोंबड्यांमध्ये घामग्रंथी नसल्याने उष्णतेचा मोठा परिणाम त्यांच्यावर होतो. त्यामुळे उन्हाळ्यात त्यांच्या शरीराचे तापमान जेवढे कमी ठेवता येईल तेवढे ठेवावे. या काळात कोंबड्यांना दूषित पाणी पुरवठा होऊ नये या पाणी शुद्धीकरण करणारे घटक वापरणे गरजेचे आहे.खाद्यापेक्षा पाण्याची उपलब्धता जास्त प्रमाणात करावी.

उन्हाळ्यामध्ये शरीरातील ऊर्जेचा ऱ्हास होतो, त्यामुळे कोंबड्या सतत पाणी पितात. यामुळे उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या भांड्यांची संख्या पंचवीस ते तीस टक्‍क्‍यांनी वाढवावी, दिवसातून पाच ते सहा वेळा भांडे स्वच्छ धुऊन त्यात थंड पाणी भरावे.

Poultry
Poultry Farming : लेअर कुक्कुटपालनात काटेकोर व्यवस्थापनावर भर

फार्ममध्ये नेहमी स्वच्छ आणि थंड पाण्याची व्यवस्था करावी. त्याचबरोबर प्लास्टिक किंवा झिंकपासून बनवलेले पाण्याचे भांडी ठेवू नका. त्याऐवजी, मातीचे भांडे वापरावे जेणे करून त्यात पाणी जास्त काळ थंड राहील. उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी पिण्याच्या पाण्यामधून जीवनसत्त्व (क ब आणि ई), तसेच सेलेनिअम आणि इलेक्ट्रोलाइट यांचा वापर करावा.

टाकीतून भांड्यांपर्यंत जाणारी पाइपलाइन शेडच्या आतमधून असावी, जेणेकरून भांड्यात पोहोचणारे पाणी थंड राहते. पिण्याचे पाणी पुरवणारी टाकी शेडमध्ये विशिष्ट उंचीवर बसवावी अथवा बाहेरच्या बाजूस बसवली असेल तर त्यास बारदानाची पोती गुंडाळून त्यावर ती थंड पाणी टाकावे. आतील पाणी थंड राहण्यास मदत होईल.

Poultry
Poultry Management : ब्रॉयलर कोंबड्यांचे आहार, आरोग्य व्यवस्थापन

खाद्य व्यवस्थापन

उन्हाळ्यात कोंबड्या कमी धान्य खातात. त्यामुळे आहारात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे प्रमाण जास्त ठेवावे. जेणे करून कमी खाल्ल्यानंतरही कोंबडीला आवश्यक ते सर्व घटक मिळतात.

कोंबड्यांना थंड काळात धान्य खायला आवडते. त्यामुळे कोंबड्यांना सकाळी थंड वातावरणात खाद्य द्यावे. कोंबड्यांना दुपारी १२ ते ३ च्या दरम्यान कमी खाद्य द्यावे. कारण खाद्यातून मोठी ऊर्जा मिळते. त्यातून उष्णता निर्माण होऊन कोंबडीची मर होऊ शकते. खाद्य देण्याचे वेळापत्रक ठरवावे. कोंबडीचे वजन १.५ किलो झाल्यावर त्यांना दुपारच्या वेळेत खाद्य देऊ नये.

खाद्य दिल्यानंतर अर्धा ते दीड तासात कोंबड्यांच्या शरीर तापमानात वाढ होते. यामुळे उष्णतेचा ताण वाढतो, म्हणून दुपारचे खाद्य देणे टाळावे.

ब्रॉयलर कोंबड्यांच्या खाद्यात मुख्य ऊर्जास्रोत म्हणून वनस्पती तेलाचा ४ ते ५ टक्के या प्रमाणात वापर करावा. शेड मधील बल्ब किंवा ट्यूबलाइट्स रात्रीच्या १ ते २ तासापर्यंत लावून कोंबड्यांना थंड वातावरणात खाद्य द्यावे.

लसीकरणाचे नियोजन

उन्हाळ्यात कोंबड्यांना विविध आजार होत असतात त्यामुळे लसीकरण करणे हे अत्यंत गरजेचे आहे. लसीकरण देण्याआधी जंतनाशक द्यावे.

उन्हाळ्यामुळे ताण कमी करण्यासाठी लसीकरण करताना सोबत जीवनसत्त्व क, अ व बी हे पाण्याच्या माध्यमातून द्यावे.

लसीकरण सकाळी आठच्या अगोदर अथवा संध्याकाळी सात नंतर करावे.

डॉ.एस.आर.शेख

८९८३१९५३०५

(पीएच.डी. स्कॉलर, पशू औषधवैद्यक शास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com