Mhaisal Irrigation Scheme : ‘म्हैसाळ’चे आवर्तन सुरू, पण शेतीला पाणी मिळेना

म्हैसाळ योजनेअंतर्गत येणाऱ्या तालुक्यांच्या गावातील सर्व शेतकऱ्यांना योजनेच्या पाण्याचे वाटप करण्यासाठी आवश्यक एवढे मनुष्यबळ आजमितीस तरी ताकारी म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन विभागाकडे उपलब्ध नाही.
Mhaisal Water Scheme
Mhaisal Water SchemeAgrowon
Published on
Updated on

Sangli News : दुष्काळी टापूतील तालुक्यांसाठी वरदान ठरलेल्या म्हैसाळ योजनेचे (Mhaisal Irrigation Scheme) उन्हाळी आवर्तन सुरू करण्यात आले आहे. म्हैसाळपासून जतपर्यंत कालव्यातून पाणी वाहताना दिसत आहे.

मिरज, कवठे महांकाळ, तासगाव आणि जत या चार तालुक्यांसाठी पाणी वाटपाचे (Water Distribution) नियोजन मात्र केलेले नाही. त्यामुळे म्हैसाळच्या पाण्याची अवस्था ‘कालव्यात पाणी आणि नियोजन पाण्यात’ अशी झाली आहे.

ऐन गरजेच्या वेळी केवळ कालव्यात पाणी बघायला मिळत आहे. प्रत्यक्षात पाणी शेतीसाठी मिळत नसल्याने, ताकारी म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन विभागाच्या ढिसाळ नियोजनाबाबत शेतकरीवर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

विभागाचे अधिकारी सामान्य जनतेला जुमानत नाहीत. लोकप्रतिनिधींनीच यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांना पाणी मिळेल, अशी व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.

Mhaisal Water Scheme
Mhaisal Water Scheme : जतमध्ये ‘म्हैसाळ’चे पाणी पोहोचणार कधी?

कायमस्वरूपी दुष्काळी भाग अशी ओळख असलेल्या मिरजेचा पूर्व भाग, कवठे महांकाळ, तासगाव, जत तालुक्यांतील शेतकऱ्यांना फेब्रुवारीनंतर म्हैसाळ योजनेच्या पाण्याची नितांत गरज असते.

उन्हाळ्याच्या सुरुवातीला पालकमंत्री सुरेश खाडे यांनी पुढाकार घेऊन म्हैसाळ योजना सुरू केली, परंतु पाण्यासाठी मागणी अर्ज नसल्याने अधिकाऱ्यांनी योजना बंद केली होती. शेतकऱ्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन म्हैसाळ योजनेचे पंप पुन्हा सुरू करण्यात आले.

सद्यःस्थितीत पहिल्या टप्प्यापासून पाचव्या टप्प्यापर्यंत योजनेचे अंदाजे ५२ पंप सुरू आहेत, परंतु पाणी वाटपाचे नियोजन अधिकाऱ्यांनी केलेले नाही. कालव्यातून पाणी वाहत आहे, परंतु उपसा परवानगी मात्र शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही.

ग्रामपंचायतींनी पुढाकार घेण्याची गरज

म्हैसाळ योजनेअंतर्गत येणाऱ्या तालुक्यांच्या गावातील सर्व शेतकऱ्यांना योजनेच्या पाण्याचे वाटप करण्यासाठी आवश्यक एवढे मनुष्यबळ आजमितीस तरी ताकारी म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन विभागाकडे उपलब्ध नाही.

त्यामुळे गावोगावी जाऊन पाणीवाटप अर्ज भरून घेणे व्यवस्थापन विभागाला शक्य नाही. शेतकऱ्यांना हक्काचे असे म्हैसाळचे पाणी वेळेवर मिळायचे असेल तर ग्रामपंचायतींनी गावात पाणी मागणी अर्ज भरून घेणे, सर्वांची पाणीपट्टी गोळा करून विभागाच्या अधिकाऱ्यांना देणे यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.

Mhaisal Water Scheme
Crop Damage : भरपाई पासून शेतकरी वंचित राहू नये

योजना पूर्ण क्षमतेने चालवण्याची गरज

या हंगामात म्हैसाळ योजना सुरू होऊन दीड महिना पूर्ण झाला. आतापर्यंत पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या टप्प्यातील १०० पंप सुरू होणे अपेक्षित होते. आजपर्यंतचा इतिहास तसाच आहे, परंतु दीड महिन्यानंतरही म्हैसाळ योजनेचे केवळ ५२ पंप सुरू आहेत.

योजनेवर अवलंबून असणाऱ्या ४ दुष्काळी तालुक्यांतील कोणत्याही भागाची पाण्याची मागणी पूर्ण होत नाही. त्यामुळे योजना पूर्ण क्षमतेने चालवायला पाहिजे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com