Water Contamination
Water ContaminationAgrowon

Water Contamination : नाशिक जिल्ह्यातील ७२ जलस्रोतांचे पाणी दूषित

Water Testing : : जिल्ह्यात टँकरची संख्या वाढत असताना दुसरीकडे ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे, त्यातीलही जलस्रोत दूषित असल्याचे आढळून आले.

Nashik News : जिल्ह्यात टँकरची संख्या वाढत असताना दुसरीकडे ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे, त्यातीलही जलस्रोत दूषित असल्याचे आढळून आले. जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील दोन हजार २३२ पाण्याचे नमुने तपासले असता यातील ७२ जलस्रोतांमध्ये दूषित पाणी आढळून आले आहे. यात सर्वाधिक प्रमाण बागलाण व त्र्यंबकेश्वर तालुक्यांत आहे. बागलाणमध्ये १५ जलस्रोतांमध्ये दूषित पाण्याचे नमुने आढळून आले.

एकूण दोन हजार २३२ पाण्याचे नमुने तपासण्यात आले होते, म्हणजे तपासण्यात आलेल्यांपैकी तीन टक्के स्रोत दूषित आढळले असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने याची गंभीर दखल घेतली असून, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना या संदर्भात लेखी सूचना केल्या आहेत.

Water Contamination
Contaminated Water : सांगली जिल्ह्यातील ६४ गावांतील पाणी दूषित

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील जलस्रोतांची अणुजैविक तपासणी करण्यात येते. या तपासणीअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक जलस्रोताचे दर महिन्याला जलसुरक्षा रक्षकामार्फत पाणी नमुने गोळा करून ते तपासणीकरिता जिल्हा प्रयोगशाळेत पाठविले जातात. जिल्हा प्रयोगशाळेत पाणी नमुन्यांची तपासणी केल्यावर दूषित नमुन्यांबाबत आरोग्य विभागाला पत्र देण्यात येते.

दूषित जलस्रोतांचे आरोग्य विभागामार्फत शुद्धीकरण करून पुन्हा तपासणी केली जाते. जैविक पाणी नमुने तपासणीत दूषित पाणी नमुने गावांची संख्या वाढत आहे. मार्च २०२४ च्या अहवालानुसार जिल्ह्यातील पाच गावांचे ब्लिचिंग पावडर नमुने हे २० टक्क्यांपेक्षा कमी क्लोरिन उपलब्धता असल्याचे आढळून आले; तर ७२ गावांचे पाणी नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यात दुष्काळाचे संकट असून, पिण्यासाठी गावागावांत टॅंकर सुरू आहेत. टंचाईग्रस्त गावांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातच दूषित पाण्याचे नमुने आढळले आहेत. त्यामुळे गावातील ग्रामस्थ दूषित पाणी पीत असल्याने यातून वेगवेगळ्या आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

Water Contamination
Contaminated Water : तारापूरमध्ये दूषित पाणी

जलस्रोतांची सुरू आहे तपासणी

जिल्हा परिषदेच्या आरोग्य आणि पाणी व स्वच्छता विभागातर्फे स्वच्छता सर्वेक्षण मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील १० हजार ३२५ जलस्रोतांची (यात नळपाणी पुरवठा योजनेचे चार हजार ६१३, तर हातपंप, सार्वजनिक विहिरी पाच हजार ७१२ असे एकूण १० हजार ३२५ स्रोतांचे पाणी नमुने गोळा केले जाणार आहेत) तपासणी केली जाणार असून, त्यासाठी १ एप्रिलपासून मोहीम सुरू झाली आहे.

३० एप्रिलपर्यंत ही तपासणी मोहीम सुरू असेल. या मोहिमेत जलस्रोतांच्या गुणवत्तेनुसार लाल, पिवळे आणि हिरवे कार्ड ग्रामपंचायतींना दिले जाणार आहे. या स्वच्छता सर्वेक्षण अभियानात सदर अभियानाबरोबरच जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात येईल.

दूषित पाणी पिणारी गावे (कंसात जलस्रोतांची संख्या)

कळवण : पाळे बु., कळमथे पा., आठंबा (३), साकोरा (२), नांदुरी, गोबलपूर

बागलाण : आराई (३), गोळवाड (७)

मालेगाव : देवरपाडे, अस्ताने, डोंगराळे, वडनेर, कोठुरे बुद्रुक, सोनज, खलाणे, निमगाव, मेहुणे

नांदगाव : मांडवड, लक्ष्मीनगर, बेजगाव, पानेवाडी, हिसवळ बुद्रुक, खिर्डी, कासारी

चांदवड : डोंगरगाव

देवळा : मटाणे (२), राहुडे

पेठ : रानपाडा, करंजखेड, फणसपाडा, चोळमुख, आमलोण

दिंडोरी : आंबेदिंडोरी (४)

सिन्नर : मोहदरी (२), निऱ्हाळे (३), वडांगळी, खडांगळी, कोमलवाडी, चोंढी, दत्तवाडी, सोमठाणे

त्र्यंबकेश्वर : पक्याचा पाडा, बांगरवाडी, झारवाड, लव्हाळईपाडा (२), रोहिले, साप्ते, कोणे, वेळे, सोमनाथनगर, शिवाजीनगर, गडदावणे, फणसवाडा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com