Rain Deficit: पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे राजुरा शेतशिवारातील सोयाबीन पीक वाळून उद्ध्वस्त झाल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता. १७) सोयाबीनची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष दामोदर इंगोले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. राजुरा येथील स्मशानभूमीत सोयाबीनचा प्रतिकात्मक अंत्यविधी करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले..वाशिम जिल्ह्यात गेल्या ४५ ते ५० दिवसांपासून पावसाचा मोठा खंड पडला आहे. त्यामुळे खरीप पिकांवर परिणाम झाला आहे. राजुरा परिसरात शेंगा भरण्याच्या निर्णायक टप्प्यात पाऊस न झाल्याने सोयाबीनची झाडे वाळली आहेत. परिणामी, उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली..Soybean Crop Crisis: पश्चिम विदर्भात सोयाबीन हातातून जाण्याची भीती.या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी केली. पीकविमा नुकसानभरपाई तातडीने मिळावी, कृषी पंपांचे वीजबिल माफ करावे आणि कर्जमाफी करावी, अशा मागण्याही करण्यात आल्या..Drought In Maharashtra: महिनाभर पावसाचा खंड, शेतकरी चिंतेत, कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी.सोयाबीनबरोबरच तूर, कापूस, उडीद आणि हळद या पिकांनाही पावसाच्या खंडाचा फटका बसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यात तातडीने पिकांचे पंचनामे करून कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली..नुकसानभरपाई मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दामोदर इंगोले यांनी दिला. खरीप पिकांचे नुकसान झाल्यानंतर रब्बी हंगामासाठीही पुरेशा ओलाव्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे वर्षभराचा खर्च भागविण्याचे आव्हान निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.