Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme: राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात वाशीम जिल्ह्यातील १७ हजार ३२७ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात १५० कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. पहिला व दुसरा टप्पा मिळून आतापर्यंत जिल्ह्यातील ४३ हजार ६६० शेतकऱ्यांना ३७४.९१ कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे..राज्य शासनाने २ जून २०२६ रोजी ही कर्जमुक्ती योजना जाहीर केली. त्यानुसार वाशीम जिल्ह्यातील ६९४ गावांमधील सेवा सहकारी संस्था तसेच राष्ट्रीयीकृत, ग्रामीण आणि खासगी बँकांमधील एकूण ५४ हजार १०२ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे..Farm Loan Waiver: दोन ते चार दिवसांत ५ ते १० हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, कृषिमंत्र्यांची माहिती.शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या दुसऱ्या टप्प्यात आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची रक्कम वितरित करण्यात आली. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ७ हजार ९१ शेतकऱ्यांना ५६.४३ कोटी रुपये, तर राष्ट्रीयीकृत बँकांच्या १० हजार २३६ शेतकऱ्यांना ९३.६२ कोटी रुपये मिळाले. अशा प्रकारे दुसऱ्या टप्प्यात एकूण १७ हजार ३२७ शेतकऱ्यांच्या खात्यात १५०.०५ कोटी रुपये जमा झाले..Farm Loan Waiver: अकोल्यातील शेतकऱ्यांना १६९ कोटींची कर्जमुक्ती.जिल्ह्यात आतापर्यंत ४६ हजार ६९८ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. त्यापैकी ४३ हजार ६६० पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पहिला व दुसरा टप्पा मिळून ३७४.९१ कोटी रुपये जमा झाले आहेत. यामध्ये सेवा सहकारी संस्थांशी संबंधित २५ हजार २०५ सभासदांना २००.२३ कोटी रुपये, तर राष्ट्रीयीकृत बँकांमधील १८ हजार ४५५ सभासदांना १७४.६८ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत..दरम्यान, अद्याप ७ हजार ४०४ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी नोंदणीअभावी आधार प्रमाणीकरण झालेले नाही. योजनेचा लाभ घेण्यासाठी ॲग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी असणे बंधनकारक आहे. त्यामुळे प्रमाणीकरण बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी विशिष्ट क्रमांक व आधार क्रमांक घेऊन नजीकच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रा’त जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आणि जिल्हा उपनिबंधक माणिकराव लटपटे यांनी केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.