Agricultural Study Tour: वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी परदेशातील आधुनिक शेती तंत्रज्ञान जवळून पाहण्याची अनोखी संधी उपलब्ध झाली आहे. राज्य शासनाच्या राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत यंदा युरोप आणि चीन येथे कृषी अभ्यास दौरे आयोजित करण्यात येणार असून, वाशीम जिल्ह्यातून पाच शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे. इच्छुक पात्र शेतकऱ्यांनी २० ऑगस्टपर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे..जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा यांसारख्या पिकांवर शेतकऱ्यांचा मोठा भर आहे. बदलते हवामान, उत्पादन खर्च आणि शेतीमालाच्या गुणवत्तेची आव्हाने लक्षात घेता आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित पीक व्यवस्थापन, यांत्रिकीकरण, उत्पादनवाढ तसेच शेतीमालाच्या गुणवत्तावाढीच्या पद्धतींचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची ही संधी महत्त्वाची ठरणार आहे. परदेशातील प्रगत शेती पद्धतींचा अनुभव घेऊन त्याचा उपयोग जिल्ह्यातील शेतीत करता यावा, हा या दौऱ्यांचा मुख्य उद्देश आहे..Agriculture Study Tour : शेतकऱ्यांना युरोप-चीन अभ्यासदौऱ्याची संधी मिळणार.जिल्ह्यातून पाच शेतकऱ्यांची निवडजिल्ह्यासाठी पाच शेतकऱ्यांचा लक्ष्यांक निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये एक महिला शेतकरी, केंद्र किंवा राज्यस्तरीय कृषी पुरस्कार प्राप्त अथवा पीक स्पर्धेतील विजेता एक शेतकरी आणि इतर तीन शेतकरी यांचा समावेश असेल. निर्धारित संख्येपेक्षा अधिक अर्ज आल्यास जिल्हास्तरावर सोडत काढून निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे..दोन लाखांपर्यंत अनुदानअभ्यास दौऱ्याच्या एकूण खर्चाच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त दोन लाख रुपये, यापैकी कमी असलेली रक्कम शासनाकडून अनुदान म्हणून मिळणार आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे..Agriculture Tour: पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी युरोप, चीनचा अभ्यासदौरा.कोण करू शकतो अर्ज?अर्जदार स्वतः शेतकरी असणे, त्याच्या नावे चालू सहा महिन्यांतील ७/१२ व ८-अ उतारा असणे आणि ॲग्रीस्टॅकअंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय दौऱ्याच्या वेळी किमान २५ वर्षे असावे. वैध पासपोर्टची अर्जाच्या वेळी किमान एक वर्षाची वैधता असणे तसेच एम.बी.बी.एस. डॉक्टरांचे तंदुरुस्ती प्रमाणपत्र आवश्यक आहे. एका शेतकरी कुटुंबातील केवळ एका व्यक्तीला लाभ घेता येईल. शासकीय, निमशासकीय, सहकारी किंवा खासगी संस्थेत नोकरी करणारे तसेच डॉक्टर, वकील, अभियंता, सनदी लेखापाल, कंत्राटदार आदी व्यावसायिक या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत. यापूर्वी शासन किंवा कृषी विद्यापीठाच्या अर्थसाहाय्याने परदेश दौरा केलेला नसावा..कागदपत्रांसह अर्ज आवश्यकअर्जासोबत ७/१२ उतारा, आधार कार्ड, शिधापत्रिका, डॉक्टरांचे तंदुरुस्ती प्रमाणपत्र आणि वैध पासपोर्टची प्रत जोडावी. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी परदेशातील आधुनिक शेतीचा अनुभव घेण्याची ही संधी गमावू नये आणि २० ऑगस्टपूर्वी अर्ज सादर करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.