Sugar Mill Land : ‘नासाका’ जमीन विक्री रद्द करण्यासाठी आंदोलनाचा इशारा

Sale of land by District Bank Objection : जमिनीसंदर्भात नाशिक जिल्हा बँकेने नासाकाच्या जमीन विक्रीसाठी काढलेल्या निविदेला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे.
Strong opposition from villagers
Strong opposition from villagersAgrowon

Nashik News : पळसे ग्रामपंचायतीने १९७४ मध्ये गावातील गायरान क्षेत्र हे साखर कारखाना उभारणी तसेच शेतकरी व कामगारांच्या हितासाठी दिले होते. याच जमिनीसंदर्भात नाशिक जिल्हा बँकेने नासाकाच्या जमीन विक्रीसाठी काढलेल्या निविदेला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. ही अतिरिक्त जमीन विक्री निविदा रद्द करावी, अन्यथा जिल्हा बँकेच्या या निर्णयाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा गुरुवारी (ता. ८) ग्रामसभेत ग्रामस्थांनी दिला आहे.

नाशिक सहकारी साखर कारखाना जिल्हा बँकेने खासदार हेमंत गोडसे यांच्या कंपनीसोबत भाडेकरार केल्याने चार तालुक्यांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र सुमारे १४० कोटी रुपयांच्या कर्जवसुलीसाठी जिल्हा बँकेच्या ताब्यातील कारखान्याचे अतिरिक्त क्षेत्र विक्री किंवा भाड्याने देण्याबाबत निविदा काढली आहे. यामुळे पळसे ग्रामस्थांनी शनिवारच्या (ता. ३) ग्रामसभेनंतर त्वरित दुसरी विशेष ग्रामसभा गुरुवारी (ता. ८) घेण्यात आली.

Strong opposition from villagers
Agrowon Podcast : बाजार समित्यांमधील कापसाचे भाव कधी वाढतील?

शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी पळसे गावाने साखर कारखाना उभारणीसाठी गायरानाची जागा दिली आहे, त्या जागेवर उभारलेल्या साखर कारखान्याचे कर्ज वाढून जिल्हा बँकेने वसुलीसाठी गावाची जागा विक्रीची निविदा काढणे बेकायदा आहे, गायरानाची जागा बँकेला विक्री करताच येणार नसून, बँकेची जमीन विक्रीबाबतची भूमिका संशयास्पद असल्याने विक्रीची निविदा रद्द करावी, अन्यथा त्याविरोधात संपूर्ण गाव आंदोलनात उतरेल, असा इशारा दिला.

ग्रामसभेस नासाका संघर्ष समितीचे विलास गायधनी, पोलिस पाटील सुनील गायधनी, शिवसेना शाखाप्रमुख दीपक गायधनी, सरपंच प्रिया गायधनी, उपसरपंच समाधान गायखे, माजी सरपंच नवनाथ गायधनी, शेतकी संघाचे संचालक शरद गायखे, दिलीप गायधनी, किरण नरवडे, शांताराम जाधव, माधव गायधनी, गणेश गायधनी, अॅड. सोपान गायधनी, अॅड. महेश गायधनी, गणपत गायधनी, मधूकर पगार, रुंजा गायधनी, तुकाराम गायधनी, यशवंत आगळे, किरण चंद्रमोरे आदी उपस्थित होते.

Strong opposition from villagers
Farmer Hunger Strike : रोहित्रासाठी शेतकऱ्यांचे उपोषण
जिल्हा बँकेने कारखाना अवसायनात काढून भाडेतत्त्वावर चालविण्यास दिला आहे; तर जमीन विक्रीचे कारणच काय? जिल्हा बँकेच्या हेतू बद्दल शंका असून,जमीन विक्री होऊ देणार नाही.
प्रिया दिलीप गायधनी, सरपंच, पळसे ग्रामपालिका
२००२ चा कायद्यानुसार जागा विक्री करता येत नाही. जागा विक्री करता येणार असा ग्रामपंचायत ठराव करण्यात आला आहे. त्यास पंचक्रोशीतून विरोध आहे. उर्वरित क्षेत्र ग्रामपंचायतीला परत देण्यात यावी अशी मागणी आहे.
विलास गायधनी, नासाका संघर्ष समिती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com