Public Service: गरजूंच्या पोटाची भूक भागवणाऱ्या शिवभोजन केंद्रचालकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या सात महिन्यांपासून प्रलंबित असलेले अनुदान अखेर शासनाकडून मंजूर करण्यात आले असून, १ कोटी ५६ लाखांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग झाला आहे. यामुळे रखडलेल्या अनुदानाचा मार्ग मोकळा झाला असून केंद्र चालकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. .जिल्ह्यात एकूण २३ शिवभोजन केंद्रे कार्यरत आहेत. मात्र, गेल्या सात महिन्यांपासून या केंद्रांना शासनाकडून अनुदान मिळाले नव्हते. पदरचे पैसे खर्च करून गरजूंना सवलतीच्या दरात भोजन देणे केंद्रचालकांसाठी कठीण झाले होते. आर्थिक कोंडीमुळे जिल्ह्यातील चार केंद्रचालकांना आपली केंद्रे नाईलाजास्तव बंद करावी लागली होती. आता निधी प्राप्त झाल्यामुळे या केंद्रांनाही नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे. केंद्रचालकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला असून, शिवभोजन थाळीची सेवा आता अधिक जोमाने सुरू राहण्यास मदत होणार आहे..Drip Irrigation Subsidy: ठिबक अनुदान वितरणात जळगाव अव्वल.शिवभोजन योजनेंतर्गत ग्राहकांना अल्प दरात जेवण दिले जाते, तर उर्वरित रकमेची पूर्तता शासन अनुदानाच्या स्वरूपात करते. शहरी भागासाठी प्रति थाळी ३५ रुपये तरग्रामीण भागासाठी प्रति थाळी २५ रुपये अनुदान दिले जाते..Shiv Bhojan Thali: शिव भोजन थाळी’ योजना सुरूच राहणार; सरकारकडून ५५ कोटींची अतिरिक्त तरतूद.वितरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरूजिल्हा प्रशासनाकडे १ कोटी ५६ लाखांचा निधी प्राप्त झाला असून, तो पात्र केंद्रचालकांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली आहे. नियमांची पूर्तता आणि कागदपत्रांची पडताळणी करून हा निधी वितरित केला जात असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे..गेल्या सात महिन्यांपासून अनुदान थकीत हाेते. यामुळे जवळील पैसे खर्च करून गरजूंची जेवणाची व्यवस्था केली जात हाेती. आता अनुदान लवकरच खात्यात जमा हाेणार असल्याने आर्थिक काेंडीतून सुटका हाेणार आहे.-केशव तळवेकर, शिवभाेजन केंद्रचालक, हिंगणघाट..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.