Damodar Ingole : उद्योगपतींसारखे शेतकऱ्यांचेही कर्जमाफ करा : दामोदर इंगोले

Demand of loan waive : सरकारने जसे मोठ्या उद्योगपतींचे कर्जमाफ केले तसेच शेतकऱ्याचेही करावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष दामोदर इंगोले यांनी केली.
Damodar Ingole
Damodar IngoleAgrowon

Washim News : लोकसभेची निवडणूक दोन महिन्यांवर आली तरी शेतकऱ्यांच्या बाजूने कुणी काहीही बोलत नाही. सत्ताधारी, विरोधक गप्प आहेत. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे सोयाबीन, कपाशीला दर मिळत नाही.

त्यामुळे सरकारने जसे मोठ्या उद्योगपतींचे कर्जमाफ केले तसेच शेतकऱ्याचेही करावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष दामोदर इंगोले यांनी केली.

Damodar Ingole
Cashew Farmers : सोयाबीन, कांदा, कापसानंतर काजूला हमी भावापेक्षाही कमी दर, तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा एल्गार

वाशीम जिल्ह्यातील मोप येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कर्जमुक्ती सभा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ शेतकरी नेते गजानन अहमदाबादकर या ळी व्यासपिठावर उपस्थित होते.

Damodar Ingole
Chana GI : खारपाणपट्टयातील हरभऱ्याला ‘जीआय’ मिळण्याची शक्यता

मोप येथे झालेल्या सभेला परिसरातील शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी पुढे बोलताना इंगोले यांनी शिवसेना-भाजप- राष्ट्रवादी या तीनचाकी सरकारवर चौफेर हल्लाबोल केला. प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना हमीभाव देऊ, उत्पन्न दुप्पट करू, कर्जमाफी करू अशी खोटी आश्वासने देऊन सत्तेवर यायचे आणि सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचे हा डाव आता शेतकऱ्यांनी ओळखला आहे.

त्यामुळे आगामी काळात सर्व शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी दिवसरात्र लढणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाठिशी आपली ताकद उभी करावी असेही ते म्हणाले. या ळी अहमदाबादकर यांनी शेतकऱ्यांची सध्या झालेली बिकट स्थिती, सरकारची शेतकरीविरोधी धोरणे याबाबत वस्तुस्थिती मांडली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com