MahaDBT : ‘महाडीबीटी’वरील अर्जांना ‘सोडती’ची प्रतीक्षा

Agriculture Scheme : राज्यातील कृषी खात्याच्या विविध योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर ‘महाडीबीटी’वर अर्ज करण्याचा सल्ला दिला जातो.
Agricultural Mechanization
Agricultural Mechanization Agrowon
Published on
Updated on

Akola News : राज्यातील कृषी खात्याच्या विविध योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर ‘महाडीबीटी’वर अर्ज करण्याचा सल्ला दिला जातो. यानुसार शेतकरी अर्जही करतात. मात्र, गेल्या काही महिन्यांत अर्जांची सोडतच झालेली नसल्याने हजारो अर्जधारक प्रतीक्षा करीत थांबलेले आहेत. विशेष म्हणजे हंगामाच्या दृष्टीने फळबाग लागवड करणाऱ्यांची मंजुरीशिवाय गोची झाल्याचे दिसून येत आहे.

शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन, कृषी साहित्य, यांत्रिकीकरण, फळबाग लागवड अशा विविध योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर महाडीबीवर अर्ज करावा लागतो. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर अनुदानाचा मार्ग मोकळा होतो. अशा योजनांचा लाभ मिळावा या उद्देशाने राज्यभरात हजारोंच्या संख्येने अर्ज दाखल होत असतात.

Agricultural Mechanization
MahaDBT : ‘महाडीबीटी पोर्टल’वर कागदपत्रे अपलोड होईना

यंदा लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून महाडीबीटीवर दाखल झालेल्या अर्जांची सोडतच निघालेली नसल्याची माहिती समोर आलेली आहे. महिनोमहिने ही प्रक्रिया रखडलेली असल्यामुळे अर्जदार शेतकरी सातत्याने कृषी विभागाकडे विचारणा करीत राहतात. कार्यालयांमध्ये चकरा मारत आहेत. फळबाग लागवड घटकात अर्ज केलेल्यांना आताच्या काळात मंजुरी मिळणे गरजेचे होते.

Agricultural Mechanization
MahaDBT : आधी अर्ज मंजूर, नंतर कारणाविना रद्द

सध्या फळबाग लागवडीचा काळ असल्याने अर्ज मंजुरी अभावी अशा शेतकऱ्यांची गोची झालेली आहे. तर सूक्ष्‍म सिंचनाचे अनुदान महिनोमहिने रखडलेले असल्याने या बाबत शेतकरी कृषी विभागाकडे सातत्याने विचारणा करीत असतात. या बाबत अधिकाऱ्यांकडे कुठलेही ठोस उत्तर मिळत नाही. शिवाय इतरही योजनांचे अनुदान मिळत नसल्याने लाभार्थ्यांचे पैसे अडकलेले आहेत. काही ठिकाणी विक्रेत्यांनी विश्‍वासावर व्यवहार केलेले असून त्यांना मूळ रक्कमही मिळालेली नाही. तेही अडचणीत आलेले आहेत.

यांत्रिकीकरणाचे उद्दिष्ट

‘महाडीबीटी’वर यांत्रिकीकरण घटकाअंतर्गत लाभ देण्यासाठी तालुक्यांना उद्दिष्ट नेमून देण्याचे प्रकार होत आहेत. तालुक्याची लोकसंख्या व मागणी पाहून कुठे १० लाख रुपयांचे तर कुठे यापेक्षा अधिक रकमेचे उद्दिष्ट दिले जात आहे. अशा प्रकारे उद्दिष्ट देण्यात येत असल्याने आश्‍चर्य सुद्धा व्यक्त होऊ लागले. पूर्वी अशा प्रकारची कुठलीही मर्यादा नव्हती. आता उद्दिष्ट येत असल्याने त्याच मर्यादेत अर्ज मंजूर होतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com