Palghar News: डहाणू तालुक्यातील दुर्गम भागातील शेतकऱ्यांचे स्थलांतर रोखून त्यांना शेतीतून स्थिर उत्पन्न मिळवून देण्यासाठी सर नेस वाडिया फाउंडेशनतर्फे कृषी आधारित शाश्वत उपजीविकेच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. .या अंतर्गत मंगळवारी (ता. २५) कासा केंद्र येथे कासा बीट, तवा, चारोटी, महालक्ष्मी, धानिवरी, दह्यले आणि ओसरविरा ग्रामपंचायत क्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांना उच्च प्रतीच्या भाजीपाला बियाण्यांचे मोफत वाटप करण्यात आले..Free Soybean Seed : चाकूरच्या ६३४ शेतकऱ्यांना मोफत सोयाबीनचे बियाणे .सर नेस वाडिया फाउंडेशन आणि डहाणू कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हे बियाणे वाटप सुरू आहे. एकूण ४०० शेतकऱ्यांना बियाणे देण्याचे नियोजन असून, आतापर्यंत २७१ शेतकऱ्यांना बियाणे मिळाले आहेत..Nana Patole : दुष्काळाने पिचलेल्या शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफ करून बी-बियाणे व खते मोफत द्या : नाना पटोले .केवळ बियाणे वाटपच नव्हे, तर कृषी विज्ञान केंद्रातर्फे लागवड, पाणी व्यवस्थापन आणि रोग नियंत्रणाचे मोफत प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जात आहे. फाउंडेशनचे कर्मचारी नियमितपणे शेतांवर भेटी देऊन पिकांची पाहणी करत आहेत. .या उपक्रमामुळे दुर्गम भागातील शेतकरी सक्षम होत असून, स्थलांतरास आळा बसण्यास मोठी चालना मिळत आहे. जनरल मॅनेजर कुशाला शेट्टी व त्यांच्या टीमने यासाठी विशेष प्रयत्न केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.