Sangali Vidhansabha Election : सांगली जिल्ह्यातील आठ मतदार संघांसाठी आज मतदान

Vidhansabha Election : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघांतील ९९ उमेदवारांचा जाहीर प्रचार सोमवारी संपला. आज (ता.)२० नोव्हेंबर रोजी मतदान असून, २५ लाख ३६ हजार ६५ मतदार सर्व राजकीय पक्ष, अपक्षांसह ९९ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.
Vidhansabha Election
Vidhansabha ElectionAgrowon
Published on
Updated on

Sangali News : सांगली : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघांतील ९९ उमेदवारांचा जाहीर प्रचार सोमवारी संपला. आज (ता.)२० नोव्हेंबर रोजी मतदान असून, २५ लाख ३६ हजार ६५ मतदार सर्व राजकीय पक्ष, अपक्षांसह ९९ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.

आठ मतदारसंघांसाठी १५ हजार ४०९ अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले असून, दोन हजार ४८२ मतदान केंद्रांवर ते मतदानासाठी साहित्य घेऊन रवाना झाले. आठ विधानसभा निवडणुकीतील दोन हजार ४८२ मतदान केंद्रांपैकी १५०८ मतदान केंद्रांवर मतदानाच्या दिवशी प्रशासनाची ‘वेबकास्टिंग’च्या माध्यमातून नजर राहणार आहे.

Vidhansabha Election
Vidhansabha Election 2024 : विधानसभेचे सोलापूर जिल्ह्यातील ३७२३ केंद्रांवर मतदान

केंद्रांवरील मतदानाची सर्व प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कॅमेऱ्यांच्या माध्यमातून थेट पाहता येणार आहे. त्यादृष्टीने नियोजनही करण्यात आले आहे. महापालिका क्षेत्रातील सर्वच मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली. जिल्ह्यात २५ लाख ३६ हजार ६५ मतदार आहेत. १२ लाख ८२ हजार २७६ पुरुष, तर १२ लाख ५३ हजार ६३९ महिला मतदारांचा समावेश आहे. आठ विधानसभा मतदार संघांतील दोन हजार ४८२ केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडणार आहे.

निवडणुकीतील ९,६८५ जणांचे मतदान जिल्ह्यात सोमवारपर्यंत नऊ हजार ६८५ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यातील ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांनी १२ डी अर्ज भरून दिला होता. या मतदारांची तीन हजार ५५४ संख्या असून, तीन हजार ४४० मतदारांनी मतदान केले आहे.

मतदार संघ आणि केंद्र

मिरज ३०७

सांगली ३१५

इस्लामपूर २९०

शिराळा ३३४

पलूस-कडेगाव २८५

खानापूर ३५६

तासगाव-कवठेमहांकाळ ३०८

जत २८७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com