Latur Assembly Election : मतदानाचा आधीच उल्हास, तिथे मोबाइलचा त्रास

Maharashtra Election 2024 : मतदान केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात मोबाइलला बंदी घातल्यामुळे मतदानासाठी केंद्रात जाताना मोबाइल कोणाकडे ठेवायचा, असा प्रश्‍न पडला.
Maharashtra Election 2024
Maharashtra Election 2024Agrowon
Published on
Updated on

Latur News : मतदारांमध्ये मतदानासाठी म्हणावा तेवढा उत्साह असत नाही. मतदानादिवशी मिळणाऱ्या सुट्टीचा आनंद लुटण्यावरच त्यांचा भर असतो. यामुळेच प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदार जागृतीचे उपक्रम राबवावे लागतात.

यातच विधासभेसाठी बुधवारी (ता. २०) झालेल्या निवडणुकीत अनेक मतदारांना मोबाइलमुळे अडचण झाली. तरीही दुपारी तीनपर्यंत लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात मिळून ४८.३४ टक्के तर धाराशिव जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात मिळून ४५.८१ टक्के मतदान झाले होते.

मतदान केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात मोबाइलला बंदी घातल्यामुळे मतदानासाठी केंद्रात जाताना मोबाइल कोणाकडे ठेवायचा, असा प्रश्‍न पडला. यामुळे गडबडीत मतदानासाठी आलेले मतदार मोबाइल ठेवण्यासाठी परतले ते पुन्हा मतदानासाठी आलेच नाही. बुधवारी सकाळी अनेक केंद्रांवर हा प्रकार पाहायला मिळाला. काही तासांनंतर मोबाइल सांभाळण्यासाठी राजकीय पक्षांनी खास सोय केली, त्यानंतर मतदानाचा टक्का वाढला.

Maharashtra Election 2024
Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात चुरशीने मतदान

विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात मंडप, दुकाने उभारणे, मोबाइल फोन, स्मार्ट फोन, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनिक्षेपके व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बाळगण्यास तसेच निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त खासगी वाहन, संबंधित पक्षाचे चिन्हाचे प्रदर्शन व निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये प्रतिबंध करण्यात आला होता.

यात केंद्रात मोबाइल घेऊन जाण्याच्या विषयावर मुंबई उच्च न्यायालयात दाखल एका जनहित याचिकेत न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. न्यायालयाने सोमवारी (ता. १८) हा निर्णय दिल्यामुळे केंद्राच्या परिसरात मोबाइल घेऊन जाण्याच्या बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली. बुधवारी सकाळी सातपासून मतदारांनी मतदान करण्यासाठी पुढाकार घेतला.

Maharashtra Election 2024
Maharashtra Assembly Election 2024 : पुणे जिल्ह्यात उत्साही वातावरणात मतदान

केंद्राच्या परिसरात पाऊल ठेवताच त्यांना पोलिसांकडून मोबाइल केंद्रात घेऊन जाण्यासाठी रोखण्यात आले. ऐनवेळी मोबाइल कोणाकडे ठेवायचा, असा प्रश्‍न निर्माण झाला. पती किंवा पत्नीसोबत आलेल्यांची अडचण झाली नाही. मात्र एकट्याने मतदानाला आलेल्यांना मोबाइल बाहेर कुठेतरी सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी परत जावे लागले.

यात काही मतदार परत मतदानासाठी आलेच नाही. यामुळे मतदान करून घेणाऱ्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून पोलिसांना मोबाइल बंदीची सक्ती न करण्याची विनंती होऊ लागली. मात्र पोलिसांनी त्यास ठाम नकार दिल्यामुळे कार्यकर्त्यांची अडचण झाली.

यामुळे मतदान करून येईपर्यंत मतदारांचे मोबाइल सांभाळण्यासाठी स्वतंत्र सोय करावी लागली. काही तासांनंतर मोबाइल ठेवण्याची अडचण दूर झाल्यामुळे मतदानाला वेग आला. तरी अनेक मतदारांनी घरी जाऊनच मोबाइल सुरक्षित ठेवण्याला प्राधान्य दिल्याचे दिसले. त्यानंतर मतदानाचा टक्का वाढण्यास सुरुवात झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com