अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्यात शेतकऱ्यांच्या शेतावर एकाच जमिनीवर शेती आणि सौरऊर्जा निर्मिती प्रायोगिक प्रकल्प सुरू आहे. या प्रयोगाला 'ॲग्रीव्होल्टॅइक्स' म्हणतात. हा प्रयोग शेतकऱ्यांना जास्तीचे उत्पन्न देण्याबरोबरच पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीसाठी नवी दिशा दाखवत आहे. हा प्रयोग व्हर्जिनियामधील पाइडमॉन्ट एन्व्हायर्नमेंटल कौन्सिल या संस्थेने सुरू केला आहे. .'राउंडअबाउट मीडोज' नावाचा हा प्रकल्प सध्या केवळ अर्ध्या एकर क्षेत्रामध्ये राबविला जात आहे. या प्रकल्पात ४२ सौर पॅनेल्स बसवण्यात आले आहेत. या पॅनेल्सच्या दरम्यान असलेल्या जागेत विविध भाजीपाला पिकांची लागवड करण्यात आली आहेत. या प्रकल्पात काही पिके थेट जमिनीवर लावली आहेत, तर काही पिके गादी वाफ्यांवर लावलेली आहेत. या दोन्ही पद्धतींचा अभ्यास करून कोणती पद्धत अधिक उपयुक्त ठरते हे तपासले जात आहे..Farming on Solar Energy : बेंबळे गावकऱ्यांनी फुलविली सौरऊर्जेवर शेती.ॲग्रीव्होल्टॅइक्स तंत्रज्ञानॲग्रीव्होल्टॅइक्स म्हणजे अशी शेती पद्धत ज्यामध्ये एकाच जमिनीवर पिकांची लागवड आणि सौरऊर्जा निर्मिती केली जाते. काही ठिकाणी सौर पॅनेल्सखाली गवत आणि फुलझाडांची लागवड केलेली आहे. यामुळे मधमाशा, पक्षी आणि इतर कीटक आकर्षित होतात, जे पिकांमध्ये परागीभवन करतात आणि उत्पादन वाढवतात. तर काही प्रकल्पांमध्ये सौर पॅनेल्सखाली जनावरांना चरण्यासाठी मोकळी जागा सोडलेली आहे. सौर पॅनेल्समुळे जनावरांना सावली मिळते. जनावरांनी तेथील गवत खाल्ल्याने जमिनीचे व्यवस्थापन आपोआप होते..प्रयोगाचे उद्दिष्टया प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतीयोग्य जमिनीचा जास्तीत जास्त वापर करून ऊर्जा आणि अन्न उत्पादन दोन्ही वाढवणे. अमेरिकेत सध्या सुमारे ६२ हजार एकरजमिनीवर ॲग्रीव्होल्टॅइक प्रकल्पांमधून सुमारे १० गिगावॅट सौर ऊर्जा तयार होत आहे. अमेरिकेच्या ऊर्जा विभागानुसार २०३५ पर्यंत सौरऊर्जेतून १ टेरावॅट वीज निर्मितीचे लक्ष्य आहे. त्यामुळे शेती आणि सौर पॅनेल एकत्र.Solar Farming : सौर शेतीत मोठी संधी.वापरण्याची संकल्पना भविष्यात अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.या पद्धतीमुळे शेतकऱ्यांना दोन प्रकारे फायदा होऊ शकतो. पहिला म्हणजे सौरऊर्जेमुळे अधिकचे उत्पन्न मिळू शकते, आणि दुसरा म्हणजे पिकांना नैसर्गिक सावली मिळाल्याने जमिनीतील आर्द्रता टिकून राहते. यामुळे पाणी वापर कमी होतो आणि उत्पादन स्थिर राहते..ही पद्धत भारतातील शेतकऱ्यांसाठीही उपयोगी ठरू शकते, विशेषतः ज्या भागांमध्ये उन्हाचे प्रमाणजास्त आहे आणि पाणी कमी उपलब्ध आहे. अमेरिकेतील हा प्रयोग दाखवतो, की आधुनिक तंत्रज्ञान आणिपारंपरिक शेती एकत्र आल्यास शाश्वत आणि फायदेशीर शेती शक्य आहे..राज्यातील ॲग्रीव्होल्टॅइकचे प्रयोगमहाराष्ट्र देखील ॲग्रीव्होल्टॅइक्स तंत्रज्ञानाबाबत प्रयोग होत आहेत. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेद्वारे शेतीमध्ये सौरऊर्जेचा वापर ३० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे. या दिशेने राज्यात विविध ठिकाणी प्रायोगिक प्रकल्प राबवले जात आहेत. .राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ॲग्रीव्होल्टॅइक्स या प्रकल्पांमध्ये भाजीपाला आणि फळपिकांसोबत सौरऊर्जेद्वारे वीज निर्मिती केली जाते. भारतात हे तंत्रज्ञान नव्याने विकसित होत असून, शेती आणि ऊर्जा उत्पादनाचा संगम शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक फायदा देऊ शकतो, असे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अक्षय ऊर्जा अभियांत्रिकी विभागातील डॉ. अनिल रुपनर यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.