Ahilynagar News : राज्यातील प्रमुख नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी तर बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर विधानसभा मतदार संघात दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यंदा अधिकतेच्या होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला असून दोघेही नेते आपापली राजकीय ताकद दाखवण्यासाठी सरसावले आहेत. बाळासाहेब थोरात आतापर्यंत आठ वेळा तर राधाकृष्ण विखे पाटील सलग सहा वेळा आमदार आहेत.
जिल्ह्यातील थोरात आणि विखे पाटील ही कुटुंबे राज्याच्या राजकारणातील महत्त्वाची आहेत. दोन्ही कुटुंबांची तीसरी पिढी आता राजकारणात सक्रिय आहे. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा शिर्डी विधानसभा मतदार संघ शेजारी-शेजारी. आतापर्यंत राजकीय सुप्त संघर्ष.
मागील पाच वर्षांत आधीची अडीच वर्षे थोरात महसूलमंत्री होते. त्यानंतर सत्ता बदलानंतर विखे पाटील महसूलमंत्री झाले. त्यानंतर अंतर्गत बाबीमुळे तसेच नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात डॉ. सुजय विखे पाटील यांचा पराभव यंदा झाल्यानंतर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही कुटुंबांचा राजकीय संघर्ष अधित तीव्रतेने चव्हाट्यावर आला आहे. संगमनेर विधानसभेला विखे समर्थक अमोल खताळ थोरांताच्या विरोधात उभे आहेत.
शिवाय योगेश सूर्यवंशी (मनसे), सूर्यभान गोरे (बसप), अब्दुल अजित (वंचित बहुजन आघाडी), अविनाश भोर (जयहिंद जयभारत), कलीराम बहिरु (भारतीय नवजवान सेना), भागवत गायकवाड (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक), प्रदीप घुले (लोकशाही पक्ष), भारत भोसले (समत पक्ष), शशिंकात दारोळे (आरपीआय), अजय भडांगे, दत्तात्रय ढगे (अपक्ष) असे उमेदवार आहेत. शिर्डीत काँग्रेसकडून माजी आमदार चंद्रभान घोगरे यांच्या सून व ज्येष्ठ नेते शंकरअण्णा खर्डे यांच्या कन्या, कृषिभूषण प्रभावती घोगरे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत.
शिवाय महंमद शाह (भारतजोडो पक्ष), राजू शेख (वंचित) तसेच भाजप नेते राजेंद्र पिपाडा यांच्यासह मयूर मुर्तडक, रामनाथ सदाफळ, रेश्मा शेख अपक्ष आहेत. शिर्डी-संगमनेरमधील सध्याची स्थिती पाहता दोन्ही वजनदार नेत्यांनी आपले वजन दाखवत आपली एकहाती सत्ता शाबुत ठेवण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. येथेही प्रमुख आणि मूळ प्रश्नांना बगल देत थेट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यामुळे शिर्डी, संगमनेरमध्ये काय होणार याकडे अहिल्यानगरचेच नव्हे तर राज्याचे लक्ष लागले आहे.
शिर्डीचे आतापर्यंतचे आमदार
भास्करराव गलांडे (१९५७ अपक्ष), कारभारी रोहमारे (१९६२ काँग्रेस), एम. ए. गाडे (अपक्ष १९६७), शंकरराव कोल्हे (अपक्ष १९७२), चंद्रभान घोगरे पाटील (आयएनसी १९७८), अण्णासाहेब मस्के (काँग्रेस १९८०, १९८५, १९९०), राधाकृष्ण विखे पाटील (काँग्रेस १९९५), राधाकृष्ण विखे पाटील (शिवसेना १९९९), राधाकृष्ण विखे पाटील (काँग्रेस २००४, २००९, २०१४), राधाकृष्ण विखे पाटील (भाजप २०१९).
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.