Marketing Federation : पणन संचालकपदी पुन्हा विकास रसाळ

Marketing Federation Director : राज्याच्या पणन संचालकपदी विकास रसाळ यांची १४ महिन्यांनी पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे.
Vikas Rasal
Vikas RasalAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्याच्या पणन संचालकपदी विकास रसाळ यांची १४ महिन्यांनी पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. डिसेंबर २०२२ मध्ये पणन मंत्रालय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असताना विशेष बाब म्हणून रसाळ यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र ही नियुक्ती ‘मॅट’ने रद्द केली होती. ही नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नतीने देण्यात आल्याचे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

श्री. रसाळ सध्या ग्राहक संघाच्या कार्यकारी संचालक पदावर कार्यरत होते. विद्यमान पणन संचालक केदारी जाधव यांच्याकडे तात्पुरता पदभार देण्यात आला होता. डिसेंबर २०२२ मध्ये रसाळ यांची पणन संचालक पदाची नियुक्ती औट घटकेची ठरली होती.

Vikas Rasal
Marketing Federation Election : ‘पणन’च्या बिनविरोध निवडणुकीची तडजोड फसली

आता पणन विभागाची जबाबदारी अब्दुल सत्तार यांच्याकडे असून त्यांच्या शिफारशीनुसार पुन्हा एकदा रसाळ यांची नियुक्ती झाल्याची चर्चा पणन विभागात आहे. श्री. रसाळ यांनी शुक्रवारी (ता.२३) पदभार केदारी जाधव यांच्याकडून स्वीकारला.

Vikas Rasal
Cotton Marketing Federation : महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघ उपाध्यक्षपदी प्रसेनजित पाटील

सुधारणांच्या अंमलबजावणीचे आव्हान

राज्यात पणन सुधारणांची लगबग सुरू आहे. राज्यातील सात बाजार समित्यांना राष्ट्रीय बाजाराचा दर्जा देऊन त्यांना निवडणूक प्रक्रियेतून वगळण्याची सध्या प्रक्रिया वेगात आहेत.

या बाजार समित्यांमध्ये पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली यांचा समावेश आहे. या पणन सुधारणांच्या अंमलबजावणीचे मोठे आव्हान पणन संचालक रसाळ यांच्यावर असणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com