Citrus Estate : विदर्भातील सिट्रस इस्टेटबाबत शासनाकडून दुजाभाव

Orange Orchard : मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भात संत्रा व मोसंबी बागांचे क्षेत्र अधिक असताना विदर्भातील तीन सिट्रस इस्टेटला प्रत्येकी २० कोटी, तर मराठवाड्यातील एकमेव सिट्रस इस्टेटला ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
Citrus Estate
Citrus EstateAgrowon

Amravati News : मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भात संत्रा व मोसंबी बागांचे क्षेत्र अधिक असताना विदर्भातील तीन सिट्रस इस्टेटला प्रत्येकी २० कोटी, तर मराठवाड्यातील एकमेव सिट्रस इस्टेटला ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

ही अन्यायकारक बाब असल्याची प्रतिक्रिया मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केली आहे.

संत्रा व मोसंबीवर संशोधन करून दर्जेदार फळ उत्पादनासाठी पंजाबच्या धर्तीवर राज्य सरकारने महाराष्ट्रात मार्च २०१९ मध्ये उमरखेड (ता. मोर्शी, जि. अमरावती), ढिवरवाडी (ता. काटोल, जि. नागपूर), तळेगाव (ता. आष्टी, जि. वर्धा) व पैठण (जि. छत्रपती संभाजीनगर) या चार सिस्ट्रस इस्टेटला मंजुरी दिली.

मंजुरीवेळी विदर्भातील तिन्ही सिट्रस इस्टेटला प्रत्येकी १२ कोटी, तर पैठण सिट्रस इस्टेटला २५ कोटी रुपये देण्यात आले होते.

चालू अर्थसंकल्पात विदर्भातील तिन्ही सिट्रस इस्टेटला प्रत्येकी २० कोटी, तर पैठण सिट्रस इस्टेटला ४० कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्याचप्रमाणे विदर्भातील उमरखेड, ढिवरवाडी, तळेगाव, येथील सिट्रस इस्टेटला पैठण सिट्रस इस्टेटप्रमाणे ४० कोटी रुपये मंजूर करून विदर्भातील संत्रा मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे.

Citrus Estate
Citrus Estate : ‘सिट्रस इस्टेट’चे आज भूमिपूजन

राज्यात १ लाख १९ हजार ८८६ हेक्टरमध्ये संत्र्यांच्या बागा आहेत. यातील १ लाख ९ हजार ९५३ हेक्टरमधील संत्रा बागा एकट्या विदर्भात असून, मराठवाड्यात ३ हजार ०२० हेक्टर, तर उर्वरित महाराष्ट्रात ६ हजार ९१३ मध्ये संत्रा बागा आहेत.

राज्यातील मोसंबी बागांचे एकूण क्षेत्र ६४ हजार ८१२ हेक्टर असून, विदर्भात १२ हजार ६८८ हेक्टर, मराठवाड्यात ४८ हजार ७९३ हेक्टर, तर उर्वरित राज्यात ३ हजार ३३२ हेक्टरमध्ये मोसंबीच्या बागा आहेत.

निधीअभावी सिट्रस इस्टेटची कामे रखडली

या निधीतून सॉइल टेस्टिंग व लिफ अनॅलिसिस लॅब, हायटेक नर्सरीची निर्मिती आणि प्रूनिंग मशिन उपलब्ध करून देणे यांसह इतर महत्त्वाची कामे करावयाची आहे. विदर्भातील सिट्रस इस्टेटला प्रत्येकी केवळ दीड ते दोन कोटी रुपये देण्यात आले. त्यामुळे निधीअभावी महत्त्वाची कामे रखडली आहे.

विदर्भातील सिट्रस इस्टेट शासनाच्या उदासीन धोरणामुळे पूर्णत्वास जाताना दिसत नसून अजूनही सिट्रस इस्टेटला पूर्णवेळ स्वतंत्र अधिकारी देण्यात आले नाहीत. वेळेवर निधी दिला जात नाही. महत्त्वाच्या कामांना गती देणे आवश्यक असताना प्रभारी अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आल्याने त्या कामांना वेग येत नाही. यात सर्वाधिक नुकसान विदर्भातील संत्रा व मोसंबी उत्पादकांचे होत आहे.
आमदार देवेंद्र भुयार

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com