Animal Science College : पदव्युत्तर शाखा परिसरातच पशुविज्ञान पदवी महाविद्यालय

College Approval : महाराष्ट्र पशू व विज्ञान विद्यापीठांतर्गंत अकोल्यात पशुविज्ञान पदविका महाविद्यालयाला मान्यता देण्यात आली आहे.
MAFSU
MAFSUAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : महाराष्ट्र पशू व विज्ञान विद्यापीठांतर्गंत अकोल्यात पशुविज्ञान पदविका महाविद्यालयाला मान्यता देण्यात आली आहे. यासाठी अकोला कृषी विद्यापीठाची २७ हेक्‍टर जागा संपादित करण्यात आली होती. परंतु अकोला विमानतळाचा संभावित विस्तार पाहता या ठिकाणी चारा लागवड व इतर प्रात्यक्षिक प्रक्षेत्र ठेवत पदव्युत्तर पशुविज्ञान महाविद्यालयाच्या परिसरातच नव्या महाविद्यालयाच्या इमारतीची उभारणी केली जाणार आहे.

तत्कालीन कुलगुरू डॉ. आशिश पातूरकर यांच्या काळात सुमारे दोन-तीन वर्षांपूर्वी अकोला येथे पशुविज्ञान पदविका महाविद्यलयाच्या उभारणीस मान्यता देण्यात आली होती. माफसूअंतर्गंत पदव्युत्तर पशुविज्ञान महाविद्यालय फार पूर्वीपासून अकोला येथे सुरू आहे. त्याच्या जोडीला पदवी अभ्यासक्रमाची सोय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

MAFSU
MAFSU : ‘माफसू’चे संशोधित तंत्रज्ञान प्रसारात सांघिक प्रयत्नांची गरज

सुरुवातीला अकोलास्थित कृषी विद्यापीठाच्या वाशीम बायपासवरील प्रक्षेत्राची जागा याकरीता उपलब्ध होणार होती. परंतु हा परिसर असुरक्षित तसेच शहरापासून लांब असल्याने त्याऐवजी दुसरी जागा मिळावी, अशी मागणी करण्यात आली. त्यानुसार बाभुळगाव येथील कृषी विद्यापीठाच्या दुसऱ्या प्रक्षेत्रावरील २७ हेक्‍टर जागा उपलब्धतेस मान्यता मिळाली.

या जागेचे हस्तांतरण देखील माफसूला करण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर ही जागा आहे. त्या ठिकाणी माफसूने प्रस्तावीत पदवी महाविद्यालयाकरिता नियोजित जागा असा फलकही लावला. परंतु याच जागेपासून काही अंतरावर शिवणी विमानतळ आहे. त्याच्या विस्तारीकरणासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी दशकापेक्षा अधिक काळापासून पाठपुरावा करीत आहेत. परंतु त्यात कोणतेही यश आले नाही.

MAFSU
Crop Compensation : केळी, कांद्याची भरपाई कधी?

मात्र विमानतळ विस्तारीकरणाला परवानगी मिळाल्यास पुन्हा उभारलेल्या पदवी महाविद्यालयाच्या इमारतीचा प्रश्‍न निर्माण होईल. त्यामुळे या जागेऐवजी पदव्युत्तर महाविद्यालय असलेल्या परिसरातच पदवी महाविद्यालयाची इमारत व्हावी, अशी सूचना करण्यात आली. त्यानुसार आता अकोला कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या माफसूच्या जागेतच पदवी महाविद्यालयाची इमारत उभी राहणार आहे.

पदव्युत्तर महाविद्यालय असलेल्या भागात माफसूची १७ हेक्‍टर जागा आहे. याच परिसरात आता पदवी महाविद्यालयाची इमारत साकारली जाणार आहे. याकरीता २०० कोटी रुपयांचा आराखडा निश्‍चित करण्यात आला असून, मुला-मुलींसाठी वसतिगृह देखील असणार आहे.
डॉ. अनिल भिकाने, विस्तार शिक्षण संचालक, माफसू, नागपूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com