Marathwada Turmeric Farming: कृषी विभागाच्या मार्गदर्शनात वाशीम तालुक्यात वारा जहाँगीर, देपूळ येथे २५० हेक्टरवर यावर्षी बेडवर हळद लागवडीचा प्रयोग करण्यात आला. एल निनोच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सरी वरंबा पद्धतीने म्हणजेच बेडवर हळद लागवडीसाठी तालुका कृषी अधिकारी अतुल जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक कृषी अधिकारी धम्मपाल पाईकराव यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. .यासाठी विहीर तसेच प्रकल्पातील पाण्याचा ठिबक, तुषार पद्धतीने शेतकऱ्यांनी वापर केला. कृषी विभागाने शेतकऱ्यांना तांत्रिक माहिती, प्रात्यक्षिके आणि सातत्याने मार्गदर्शन केले. त्यातून पुढील हा प्रयोग साकारला. यात राईज्ड बेड पद्धत म्हणजेच दीड उंचवटे केल्याने पाणी साचले नाही..Turmeric Crop Insurance: हळदीचा फळपीक विम्यात समावेश.सरी वरंबा पद्धतीने हळद लागवड केल्याने पिकाचे उत्पादन वाढतेच शिवाय पावसाचा निचरा लवकर होतो. शेतकऱ्यांनी हळद लागवडीसाठी गांडुळ खत, बीजामृत, जीवामृताचा वापर केला. हळद + मिरची, हळद + सोयाबीन, हळद + भाजीपाला अशी पीक पद्धती तयार झाली. सेलम, राजापुरी या वाणांची लागवडीसाठी निवड करण्यात आली. वारा देपूळ परिसरात कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ डॉ. भरत गीते यांचेही हळद व इतर पिकांसाठी मार्गदर्शन मिळाले..शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान स्वीकारले म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात लागवड झाली. कृषी विभागाने फक्त मार्ग दाखवला. पुढील वर्षी हा प्रयोग संपूर्ण तालुक्यात नेऊ.धम्मपाल पाईकराव, सहायक कृषी अधिकारी, देपूळ.Turmeric Cultivation: रिसोड तालुक्यात यंदा हळद लागवडीत वाढ होण्याची शक्यता.शेतकऱ्यांचे आर्थिक बळकटीकरण व्हावे यासाठी ‘विकेल ते पिकेल’ या शासनाच्या धोरणानुसार तसेच शाश्वत उत्पादन देणाऱ्या हळद पिकांचे कमी कर्चात जास्त उत्पादन कसे घेता येईल या दृष्टीने वारा जहागिरी, देपूळ येये विविध प्रयोगाद्वारे हळद पीक घेण्याचा सल्ला दिला. या प्रयोगात कमी खर्चात जास्त उत्पादन मिळेल. हा पॅटर्न फिक्स करून संपूर्ण तालुक्यात राबवू.अतुल जावळे, तालुका कृषी अधिकारी, वाशीम.मी मागील वर्षी सरी वरंबा पद्धतीने एक एकरात हळद पिकाची लागवड केली होती. यामध्ये सोयाबीन आंतर पीक घेतले होते. मला त्यामध्ये सात क्विंटल सोयाबीन व २५ क्विंटल हळद झाली.सुधाकर दिनकर गंगावणे, शेतकरी, देपूळ.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.