Rainfall Deficit: खरिपाच्या अखेरच्या टप्प्यात पावसाने दडी मारल्याने भात पिके वाचवण्यासाठी पालघर तालुक्यातील शेतकरी धडपड करत आहे. अशातच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने धरणातील साठा पिण्याच्या वापरासाठी आरक्षित केल्याने सिंचनाच्या पाण्याअभावी भातशेतीला फटका बसण्याची शक्यता आहे..पालघर तालुक्यातील गांजे गावाच्या हद्दीतील वांद्री धरणाची साठवण क्षमता ३५ दशलक्ष घनमीटर आहे. या धरणातील पाण्याच्या सिंचनासाठी वापर होतो. मात्र, यंदा दाणे भरण्याच्या टप्प्यातच पावसाने विश्रांती घेतल्याने पाण्याअभावी पिके करपण्याचा धोका वाढला आहे. अशातच वांद्री धरणातील सिंचनासाठीचे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. .Drinking Water Crisis: आदिवासी कातकरी वस्ती तहानलेली!.त्यामुळे उपलब्ध पाण्याचा वापर सिंचनासाठी करण्याची मागणी केली जात आहे. धरणातील १३ एमएलडी साठा आरक्षित आहे. नंदाडे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी २ एमएलडी, तर रिलायन्सच्या टोकराळे येथील पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी ११ एमएलडी पाणी राखीव आहे. मात्र, जलवाहिन्यांची कामे अपूर्ण असल्याने सहा महिने प्रतीक्षा कारवी लागणार आहे. वांद्री धरणातील जॅकवेल दुरुस्तीच्या कामासाठी संपूर्ण धरण रिकामे करण्यात आले होते. धरणातील पाणी वांद्री नदीमार्गे वैतरणा खाडीत सोडण्यात आले होते. यंदा सिंचन क्षेत्रात निम्म्याने घट झाली आहे..Water Crisis : चारशे तलावांमध्ये केवळ ३० टक्के पाणीसाठा जमा.‘या’ गावांना सिंचनाचे पाणीवांद्री धरणाच्या डाव्या कालव्यातून वेहलोली, खैरे, सातिवली, कुडे, बोट, हालोली परिसरातील शेतीला तर उजव्यातून गांजे, ढेकाळे, वरई, गुंदावे, दहिसर, साखरे, नावझे, गिराळे, पारगाव, सोनावेला लाभ मिळतो..वांद्री धरणाच्या दोन्ही कालव्यांच्या. दुरुस्तीसाठीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात दिला आहे. भात शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी होत आहे. परंतु, पिण्यासाठी नियोजनाचे निर्देश आहेत.- सचिन पाटील, कार्यकारी अभियंता