Jalgaon News: लिंबूवर्गीय फळ पिकांत शेतकरी, शास्त्रज्ञ आदींच्या पुढाकार, सहकार्यातून चांगले काम झाले आहे. पण या फळपिकांत मूल्यवर्धनाला आणखी बळ मिळाल्यास या पिकातील अर्थकारण उंचावेल. त्याचा लाभ शेतकऱ्यांना होईल. त्यासाठी शेतकरी, शास्त्रज्ञ, विविध संशोधन संस्था, उद्योजकांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचे मत दिल्ली येथील नॅशनल ॲकॅडमी ऑफ अॅग्रिकल्चर सायन्सेसचे (एनएएस) अध्यक्ष डॉ. हिमांशू पाठक यांनी जैन हिल्स येथे आयोजित लिंबूवर्गीय फळ पीक परिषदेत (नॅशनल सिट्रस सिम्पोजियम - २०२५) व्यक्त केले. .रविवारी (ता. २१) या तीनदिवसीय परिषदेचे सकाळी डॉ. पाठक यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते. जैन इरिगेशन सिस्टिम्स व नागपूर येथील इंडियन सोसायटी ऑफ सिट्रिकल्चर यांच्यातर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (ता. २३) परिषदेचा समारोप होणार आहे. देशविदेशांतील शेतकरी, शास्त्रज्ञ या परिषदेत सहभागी झाले आहेत..Citrus Farming: लिंबूवर्गीय फळबागेतील आंबिया बहर नियोजन .व्यासपीठावर जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.चे उपाध्यक्ष अनिल जैन, नागपूर येथील इंडियन सोसायटी ऑफ सिट्रसचे अध्यक्ष दिलीप घोष, शास्त्रज्ञ डॉ. एन. कृष्णमूर्तीकुमार, जैन इरिगेशन सिस्टीम्सचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, गांधी रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त डॉ. सुदर्शन अयंगार होते..डॉ. पाठक म्हणाले, की अन्नधान्याच्या बाबतीत चांगले काम झाले. आपण आयातदार होतो. आता निर्यातदार, पुरवठादार झालो आहोत. कोविड काळात देशाने जगाला अन्न पुरविले. हे शेतकरी, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ यांच्या मदतीने शक्य झाले. शेतकरी केंद्रस्थानी ठेवून काम व्हायला हवे. लिंबूर्गीय पिकांत काम केले जात आहे..पण ढासळलेली उत्पादकता व अन्य समस्यांसाठी एकत्रित प्रयत्न हवे. शेतकऱ्यांना शाश्वत, पर्यावरणपूरक उपाय, तंत्र पुरविण्याची आवश्यकता आहे. जैन इगिरेशनसारख्या संस्था पाणी, पर्यावरण यासंबंधी चांगले काम करीत आहेत. पाणी, माती व्यवस्थापनातून बुंदेलखंडमध्ये फळपिके वाढली. केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहे. नवे शास्त्र, तंत्र हवे आहे, असेही डॉ. पाठक म्हणाले..Citrus Farming: संत्रा काढणी होईपर्यंत अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर भर.महात्मा गांधी यांच्या विचारांतून प्रेरित होऊन शेतीसाठी काम करायला हवे. उत्तम, दर्जेदार उत्पादन, गुणवत्ता यास प्राधान्य द्यायला हवे, असे गांधी रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त सुदर्शन अयंगार म्हणाले..लिंबूवर्गीय फळ पीक परिषदेमध्ये लिंबूवर्गीय पिकांसंबंधी मंथन केले जाईल. शेतकरी, शास्त्रज्ञ या सर्वांचे मत, विचार ऐकून शिफारशी केल्या जातील. लिंबूर्गीय पिकांत मोठी ताकद असून, चांगला महसूल यातून तयार होत आहे. पण रोगराई, अन्नद्रव्य व्यवस्थापन, कमी उत्पादन आदी अडचणी आहेत. १०० देशांत लिंबूवर्गीय पिकांवर काम केले जाते. चीन, ब्राझीलनंतर भारतात लिंबूवर्गीय पिकांत मोठे उत्पादन घेतले जाते. पण निर्यातक्षम उत्पादनासंबंधी अडचणी आहेत, असे नागपूर येथील इंडियन सोसायटी ऑफ सिट्रसचे अध्यक्ष अध्यक्ष दिलीप घोष म्हणाले. या वेळी लिंबूवर्गीय फळ पिकासंबंधीच्या विविध पुस्तिका, पिकवाणांचे सादरीकरण व प्रकाशन करण्यात आले..जैन इगिरेशनचा नवतंत्रासाठी पुढाकार : अनिल जैनजैन इरिगेशनने शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी काम केले. शेतकरी हा आमच्या कामाचा आत्मा आहे. त्यासाठी नवे कृषी तंत्र, वाण आणले. उत्पादन, प्रक्रिया यास बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी समाजाच्या उन्नतीसाठी सर्वांनी एकत्र काम करण्याची गरज आहे, असे जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन म्हणाले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.