Sugarcane Juice : आरोग्यवर्धक ऊस रसाचे मूल्यवर्धित पदार्थ...

Health Benefits Of Sugarcane Juice : ऊस नैसर्गिकरित्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आढळतात.
Sugarcane Juice
Sugarcane JuiceAgrowon

अबोली भातलवंडे, डॉ.पी.यू.घाटगे

Sugarcane Produce : ऊस नैसर्गिकरित्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आढळतात. हे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात. लोह, मॅग्नेशिअम, कॅल्शियममुळे डिहायड्रेशन बरे करण्यास मदत होते.

१) उसाच्या रसामध्ये पोटॅशियम, फ्लेव्होनॉईड्स ॲन्टीऑक्सिडंट्स, साखर आणि कॅलरीज असतात. त्वचेसाठी हा रस चांगला आहे. मधुमेह व्यक्तींसाठीही हा रस फायदेशीर ठरतो. रसाचा फायदा कावीळ झालेल्या पेशंटसाठी होतो. कारण उसाचा रस प्यायल्याने यकृताचे काम चांगले होते.

२) उसातील घटक शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करतात. यामध्ये नॅचरल स्वीटनर्स असतात. त्यामुळे मधुमेहींनी उसाच्या रसाचे योग्य प्रमाणात सेवन करणं सुरक्षित मानले जाते.

३) उसाच्या रसामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते, त्यामुळे डॉक्टर रुग्णांना उसाचा रस पिण्याचा सल्ला देतात. उसाच्या रसामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, जो साखरेची पातळी नियंत्रित करतो. जास्त साखर असलेल्या पेयांऐवजी रस प्यायल्याने मधुमेह टाळण्यास मदत होते.

कारण त्यात नैसर्गिक साखर असते, ज्यामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढत नाही. परंतु, त्याचे जास्त प्रमाणात सेवन होणार नाही याची काळजी घ्यावी. टाइप २ मधुमेह असलेल्या लोकांनी त्यांच्या आहारात उसाचा रस समाविष्ट करण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Sugarcane Juice
GST On Sugarcane Juice : आता ऊसाच्या रसावरही जीएसटी!

४) कावीळग्रस्त व्यक्तीला उसाचा रस घेण्याचा सल्ला दिला जातो. यकृतासाठी हा रस अत्यंत फायदेशीर असतो. ऊस रसामध्ये असणार पोलिकॉसनोलमुळे यकृताचे कार्य सुधारते. त्याच्याशी संबंधित सर्व आजार नियंत्रणामध्ये राहतात.

५) मजबूत रोगप्रतिकारक शक्ती ही काळाची गरज आहे. म्हणूनच, नियमितपणे एक ग्लास उसाचा रस घेतल्याने आपली प्रतिकारशक्ती वाढू शकते.

६) उसाच्या रसामध्ये जास्त प्रमाणात असलेले तंतूमय घटक वजन घटवण्यास मदत करतात. शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करून आपले हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात.

७) उसाचा रस चेहऱ्यावरील पुरळ कमी करण्यास मदत करतात. त्यातील उच्च पातळीचे सुक्रोज जखमा भरण्यास मदत करते. त्यासह शरीरातील विषारी घटक काढून टाकते.

८) उसाच्या रसामध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, लोह, पोटॅशियम आणि फॉस्फरसचे प्रमाण मुबलक असते. हे सर्व घटक आपल्या हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

९) उसाच्या रसात साखरेचे प्रमाण जास्त असले तरी त्यात फॅट अजिबात नसते. जर तुम्ही बाजारात मिळणारे कोल्ड्रिंक्स प्यायला तर ते तुमच्या शरीराला भरपूर कॅलरीज आणि फॅट देतात. मग हळूहळू ती चरबी शरीराच्या अवयवांभोवती जमा होऊ लागते आणि तुमचे वजन वाढू लागते.

Sugarcane Juice
Sugarcane Farming : नद्यांच्या पातळीत घट, ऊसशेतीसमोर उभे संकट

पावडरीचे आइस्क्रीम

आइस्क्रीम हे मुख्यत्वे दूध तसेच दुधाची पावडर वापरून तयार केले जाते. यामध्ये गोड पदार्थ प्रामुख्याने सुक्रोज, फळे, चॉकलेट मिसळले जाते. आइस्क्रीममध्ये दुधापेक्षा तीन किंवा चार पट जास्त कार्बोहायड्रेट आणि १२ ते १६ टक्के प्रथिने असतात.

आइस्क्रीम हा ऊर्जेचा उत्कृष्ट स्रोत आहे, कारण त्यातील एकूण घन पदार्थांपैकी ५० टक्के शर्करा म्हणजे लॅक्टोज, सुक्रोज आणि कॉर्न सिरप सॉलिड्स असते.

ऊस प्रजनन संस्थेने ऊस रसाचे सरबत, गूळ पावडरीपासून आइस्क्रीम तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे.यामध्ये आइस्क्रीममधील साखरेच्या जागी आरोग्यवर्धक साखर मिसळली जाते. साखरेएवजी उसाचा रस, गूळ पावडर वापरल्याने नैसर्गिक चवीसह आणि उसाचे पौष्टिक फायदे मिळतात.

संपर्क : डॉ.पी.यू.घाटगे,९४२२८७९५५१ - (अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com