Water Update : पाणी काटकसरीने वापरा

Palkhed Irrigation Department : येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत पाणीपुरवठा होण्यासाठी पालखेड धरणावरून चार गावांना पाणी पुरविणाऱ्या योजनांंमधून काटकसरीने पाणीपुरवठा करावा. असे निर्देश पालखेड पाटबंधारे विभागाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला दिले आहेत.
Palkhed Dam
Palkhed DamAgrowon

Pimpalgaon Basvant : अपुऱ्या पर्जन्यमानामुळे पालखेड धरणातील साठ्यात यंदा कमालीची घट झाली आहे. येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत पाणीपुरवठा होण्यासाठी पालखेड धरणावरून चार गावांना पाणी पुरविणाऱ्या योजनांंमधून काटकसरीने पाणीपुरवठा करावा. नागरिकांनाही पाणीबचतीचा संदेश द्यावा,

असे निर्देश पालखेड पाटबंधारे विभागाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला दिले आहेत. पालखेड पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता प्रशांत गोवर्धने यांनी तसे पत्राद्वारे कळविले आहे. त्यामुळे पालखेड धरणावर तहान भागविण्याची भिस्त असलेल्या ‘त्या’ चार गावांमध्ये उन्हाळ्यात पाणीबाणी जाणवणार आहे.

पालखेड धरणावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून ओझर, साकोरे (ता. निफाड) व मोहाडी, जानोरी (ता. दिंडोरी) या चार गावांसाठी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. सुमारे एक लाख लोकसंख्येची तृष्णा पालखेड धरणातील पाण्यातून भागविली जाते.

यंदा पालखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने ओढ दिली. त्यांचा परिणाम योजनाच्या पाणीपुरवठ्यावर होणार आहे. सध्याच संबंधित चारही गावांमध्ये पाणी कपात केल्याने एक ते दोन दिवसआंड पाणीपुरवठा होत आहे.

Palkhed Dam
Water Management : योग्य नियोजनातून करा पाणीटंचाईवर मात

पालखेड पाटबंधारे विभागाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला धरणातील उपलब्ध पाणी जपून वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे ‘त्या’ चार गावांवर पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होणार आहे. ओझर, साकोरे, मोहाडी, जानोरी गावांसाठी पालखेड धरण पाच ते सात किलोमीटर अंतरावर आहे.

असे असले तरी आडात नाही, तर पोऱ्यात कुठून येणार, अशी स्थिती आहे. त्यामुळे ‘धरण उशाला, कोरड कशाला’ ही अवस्था होऊन चार गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य दिसेल. पाण्यासाठी नागरिकांना उन्हाळ्यात वणवण करावी लागेल.

Palkhed Dam
Water Tax : शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी करवसुली गरजेची

पालखेड १०, तर करंजवणमध्ये ५४ टक्के साठा

पालखेड हे साठवण धरण म्हणून गणले जाते. त्यात सध्या अवघा ६२ दशलक्ष घनफूट म्हणजे अवघा १० टक्के पाणीसाठा आहे; तर पालखेड धरणाला पाणीपुरवठा करणाऱ्या करंजवण धरणात दोन हजार ४५४ दशलक्ष घनफूट म्हणजे ४५ टक्के साठा आहे.

त्यामुळे सध्या दोन्ही धरणांची पातळी पाहता दुष्काळाच्या झळा ऐन मार्चच्या मध्यावर संबंधित गावांना बसणार आहेत. दरम्यान, पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीलाही पालखेड पाटबंधारे विभागाने पाणी काटकसरीने वापण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पावसाला अजून तीन महिने अवकाश आहे. सध्याचा पालखेड व करंजवण धरणांतील साठा पाहता पाणी जपून न वापरल्यास टंचाईला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व पाणीपुरवठा योजनांच्या गावांना पाणी काटसरीने वापरण्याच्या सूचना पत्राद्वारे केल्या आहेत.
प्रशांत गोवर्धने, उपविभागीय अभियंता, पालखेड पाटबंधारे उपविभाग, पिंपळगाव बसवंत

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com