Millets Year 2023 : भरडधान्यांचा वापर आहारात वाढवला पाहिजे : कृषिमंत्री तोमर

भारत सरकारच्या प्रस्तावाचा स्वीकार करून संयुक्त राष्ट्र संघाने २०२३ वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षे म्हणून घोषित केले आहे.
Narendra Tomar
Narendra TomarAgrowon

भरडधान्याची (Millets Year) उत्पादकता, उत्पादन आणि प्रक्रियेवर भर देण्याची गरज आहे. तसेच भारतीयांनी पौष्टिक भरडधान्याचा आहारात वापर वाढवला पाहिजे, असे आवाहन केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर (Narendra Singh Tomar) यांनी केले. ते बुधवारी (ता.१८) भरडधान्य राष्ट्रीय परिसंवादामध्ये बोलत होते.

Narendra Tomar
Wheat Rate : गहू दरात विक्रमी वाढ

भारत सरकारच्या प्रस्तावाचा स्वीकार करून संयुक्त राष्ट्र संघाने २०२३ वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षे म्हणून घोषित केले आहे. त्यानिमित्ताने देशात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

तोमर म्हणाले, "भरडधान्य भारतीय धान्य आहे. तसेच ते पौष्टिक मूल्यांनी परिपूर्ण आहे. मात्र भारतीय लोकांच्या आहारात गहू व तांदळाला अधिक महत्त्व दिले जाते. आता वेळ आली आहे की, आहारात भरडधान्याचा वापर केला पाहिजे. केंद्र सरकार त्याच दृष्टीने गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करत आहे."

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर सरकार भर देत असल्याचा दावाही तोमर यांनी केला.

पुढे तोमर म्हणाले, केंद्र सरकारने गेल्या आठ वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी पीएम-किसान आणि पीक विमा योजना प्रधानमंत्री फसल विमा योजना यासारखे विविध योजना सुरू केल्या आहेत. तसेच सरकारने या आर्थिक वर्षासाठी १८ लाख कोटी रुपयांचे कृषी कर्जाचे उद्दिष्टही ठेवले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com