Influenza Illness : मास्क वापरा, काळजी घ्या!

खबरदारीचा उपाय म्हणून सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करण्यासह हात धुणे आणि स्वच्छता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Influenza Illness
Influenza IllnessAgrowon

Mumbai News : देशात इन्फ्लुएन्झाच्या (विषाणूजन्य आजार) ‘एच ३ एन २’ नव्या विषाणूमुळे हरियाना आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झाले आहे.

नीती आयोगाने या संदर्भात सर्व राज्यांच्या वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांसह आढावा बैठक घेतली. त्यात सदर आजाराची तीव्रता आणि उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

खबरदारीचा उपाय म्हणून सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करण्यासह हात धुणे आणि स्वच्छता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विषाणूचा सामना करण्यासाठी रुग्णालयांमध्ये मनुष्यबळ, औषधसाठा, ऑक्सिजन आणि अन्य उपकरणे सज्ज ठेवण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.

Influenza Illness
Poultry Disease : कोंबड्यातील मुख्य जीवाणूजन्य आजार

सामान्यत: मेमध्ये दिसणारे फ्ल्यूचे रुग्ण यंदा हवामान बदलामुळे लवकर आढळले आहेत. त्यातच नव्या ‘एच ३ एन २’ विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने आरोग्य विभाग चिंतेत आहे. त्या पार्श्वभूमीवर नीती आयोगाने सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत.

काय आहेत मार्गदर्शक तत्त्वे?

१. लहान मुले, सहव्याधी असलेले वृद्ध रुग्ण आणि गर्भवती महिला इन्फ्लुएन्झाच्या दृष्टीने सर्वाधिक जोखीम गट आहेत. त्यामुळे अशा रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवावे.

२. आजाराचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करण्यासह वेळोवेळी हात धुण्यावर भर देण्यासाठी जनजागृती करणे. चाचण्यांचा अहवाल लवकर वेळीच देऊन योग्य उपचार करावे.

३. इन्फ्लुएन्झासारख्या आजाराची लक्षणे असलेल्या अधिकाधिक रुग्णांचे नमुने आणि तीव्र श्वसन संसर्गाचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत. ४औषधे, वैद्यकीय उपकरणे, ऑक्सिजन आदींसह रुग्णालयात उपचारांची तयारी करा.

Influenza Illness
Health Facilities : नर्मदेकाठाच्या गावांना स्पीडबोटच्या सहाय्याने आरोग्य सुविधा
आरोग्य विभागाने नीती आयोगाकडून मिळालेल्या सूचनेनंतर मुंबईतही तयारी सुरू केली आहे. रुग्णालये आणि डॉक्टरांना इन्फ्लुएन्झा व श्वसनासंबंधित रुग्णांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. पाहणीत मुंबईत इन्फ्लुएन्झा किंवा तीव्र श्वसनविकारांच्या रुग्णांमध्ये कोणतीही वाढ दिसून आलेली नाही.
डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी, महापालिका

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com