डॉ. संतोष डाखरेआम्ही महासत्ता आहो, महाशक्ती आहो, आम्ही काहीही करू शकतो, अशा आविर्भावातील अमेरिकेचे हे वर्तन निश्चितच भूषणावह नाही. उद्या याच न्यायाने जगातील इतर बलाढ्य राष्ट्रांनी वागायचे ठरविल्यास छोट्या राष्ट्रांचे अस्तित्वच संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही..‘युद्ध कितीही आवश्यक किंवा न्याय्य वाटले तरीही तो गुन्हा आहे.’ असे एर्नेस्ट हेमिग्वे या विचारवंताचे एक प्रसिद्ध वाक्य आहे. वर्तमानातील अमेरिका, इस्राईल विरुद्ध इराण यांच्यातील युद्ध पाहू जाता या परिस्थितीला हे विधान अगदी तंतोतंत लागू पडते. इराणवर युद्ध लादावे असा कोणताही गुन्हा त्या देशाने केल्याचे सध्या तरी दिसून येत नाही. इराण अणुबॉम्ब बनवू शकतो, या संशयातून त्या देशावर बळजबरीने लादलेले हे युद्ध आहे, असे आपणास म्हणता येईल. इराणची अणुसज्जता ही एकमेव बाब या युद्धास कारणीभूत नाही तर यामागे अनेक कारणे दडलेली आहेत..Japan Election 2026: जागतिक ‘फॅसिझम’चा जपानी अवतार.१९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर इराण आणि इस्राईल यांच्यातील संबंध पूर्णतः संपुष्टात आले. इराणने कधीही इस्राईलला मान्यता दिली नाही. लेबनॉन, पॅलेस्टाईन आणि येमेनमधील अनुक्रमे हिजबुल्ल्ला, हमास आणि हैथी सारख्या इस्राईलविरोधी गटांना इराण पैसा आणि शस्त्र पुरवितो असा इस्राईलचा आरोप आहे. तसेच इराणचा अणुकार्यक्रम इस्राईलला त्याच्या अस्तित्वासाठी धोका वाटतो. यातूनच एप्रिल २०२४ मध्ये इस्राईलने सिरियातील दमास्कस येथे इराणच्या दूतावासावर हल्ला केला होता..ज्यामध्ये इराणचे दोन जनरल्स मारले गेले होते. प्रत्युत्तरात इराणने ड्रोन आणि मिसाईलने इस्राईलवर हल्ला केला होता. जून २०२५ मधेही इस्राईलने हल्ला करून इराणचे लष्करी तळ, मिसाईल कारखाने, अणूसुविधा केंद्रे नष्ट केली होती. याचवेळेस अमेरिकेनेही इराणवर हल्ला केला होता. तेव्हा अमेरिकेने स्पष्ट केले होते की आता इराणजवळ कोणतेही घातक अणुअस्त्रे शिल्लक नाहीत. मग असे असतानाही परत त्या देशावर युद्ध लादण्याची ही घाई का?.Bangladesh: 'आमच्या जनतेचे हित सर्वोच्च असेल'; बांगलादेशच्या परराष्ट्र धोरणावर तारिक रहमान काय म्हणाले?.प्रतिस्पर्धी देश दुसऱ्या देशाला युद्धासाठी चेतावणी देत असेल, युद्धाची धमकी देत असेल किंवा प्रत्यक्ष युद्धास सुरुवात करत असेल तर अशा प्रसंगी दुसऱ्या देशाला स्वसंरक्षणार्थ त्या देशासोबत युद्ध लढावे लागते. मात्र, येथे इराणकडून अशी कोणतीही कृती न घडता थेट अमेरिका आणि इस्राईलने त्यांच्यावर हल्ला केला. अयातुल्ला खामेनेईला संपवून आपल्या हस्तकाकडे तेथील सत्ता सोपवायची आणि तेल संपन्न या राष्ट्रावर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा अमेरिकेचा हा डाव होता. मात्र, खामेनेई संपल्यानंतरही युद्ध सुरूच असल्याने अमेरिका आणि इस्राईलचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत..आपले ईप्सित साध्य करण्याकरिता एखाद्या सार्वभौम राष्ट्राच्या प्रमुखाला असे हल्ला करून ठार करणे कोणत्या युद्ध नियमामध्ये बसते यावर विचार होणे गरजेचे आहे. काही महिन्यापूर्वी अशाच एका सार्वभौम राष्ट्राच्या (व्हेनेझुएला) प्रमुखास अमेरिकेने बळजबरीने उचलून आणले होते. आम्ही महासत्ता आहो, महाशक्ती आहो. आम्ही काहीही करू शकतो अशा आविर्भावातील अमेरिकेचे हे वर्तन निश्चितच भूषणावह नाही. उद्या याच न्यायाने जगातील इतर बलाढ्य राष्ट्राने वागायचे ठरविल्यास छोट्या राष्ट्रांचे अस्तित्वच संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही. रशियाने यापूर्वीच युक्रेनवर हल्ला करून बराचसा भूभाग हस्तगत केला आहे. तिकडे चीन तैवानवर कधीचाच टपून बसला आहे..India Bangladesh Relations: बांगला देशकडून संतुलित नीतीचे संकेत.प्रत्येक सार्वभौम देशाला आपल्या संरक्षणाकरिता लष्करीदृष्ट्या सक्षम होणे अपरिहार्य असते. जशी भीती इस्राईलला इराणची वाटते त्याचप्रमाणे इराणला सुद्धा इस्राईलची भीती वाटणे साहजिक आहे. इराणची अणुसज्जता ही खाडी देशांकरिता आणि एकूणच जगाकरिता धोकादायक आहे, असे गृहीत धरले आणि त्या न्यायाने या हल्ल्याचे समर्थन केले तर मग उत्तर कोरिया तर जगजाहीरपणे त्यांच्या अनुअस्त्रांचे, अणुबॉम्बचे प्रदर्शन करीत असतो. मग अशीच कारवाई त्या देशावरही व्हावयास हवी मात्र असे होताना दिसत नाही. कारण त्या देशाला चीन आणि रशियाचे भक्कम समर्थन आहे. बलाढ्य राष्ट्रांनी दिवसेंदिवस अणुसज्ज व्हायचे आणि अन्य राष्ट्रांवर मात्र बंधने लादायची, हा कुठला न्याय आहे..युद्धाचा डावइराण हे इस्लामी राष्ट्र असून विविध दहशतवादी संघटनांचे ते पाठीराखेही आहे, हे सर्वश्रुत आहे. अशा राष्ट्राशी आंतरराष्ट्रीय संबंध तोडून, व्यापार बंदी करून अद्दल घडविता आली असती, त्याकरिता युद्धच करायची गरज नाही. कारण युद्ध केवळ सैनिकांचा बळी घेत नसते तर त्यामध्ये हजारो निष्पाप नागरिकांनाही जीव गमवावा लागतो. अमेरिकन हल्ल्यात इराणमधील दीडशे विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला. हे जगाने बघितले आहे. इराण जगातील प्रमुख तेल उत्पादक देश आहे. अनेक आशियाई देशांना तो तेल पुरवितो. मुख्यता चीनला. अमेरिका चीनला आपला प्रतिस्पर्धी समजतो. त्यामुळे या माध्यमातून चीनच्या मुसक्या आवळण्याचा हा प्रयत्न आहे..West Asia trade : युद्ध दीर्घकाळ सुरु राहील तर भारताची शेतमाल निर्यात धोक्यात; जीटीआरआयच्या अहवालात महत्त्वाचा इशारा .आगामी काळात अमेरिकन डॉलरला बगल देऊन चिनी चलनामध्ये तेलाचा व्यवहार करण्याचे इराणने ठरविले होते. इराक, सौदी अरेबिया, ओमान सारखे खाडी देश आधीच अमेरिकेच्या वर्चस्वाखाली आहेत. मात्र यास इराण एकमेव अपवाद होता. होर्मूझ खाडीतून आशियामध्ये सर्वाधिक तेल पुरवठा होत असतो. इराकवर युद्धाच्या माध्यमातून वर्चस्व प्रस्थापित करून होर्मूझ खाडीवरही नियंत्रण प्रस्थापित करणे अमेरिकेचा उद्देश आहे. या माध्यमातून आशियामधील देशावर अमेरिका आपला प्रभाव निर्माण करू शकतो. अमेरिकेला स्वतः इराणकडून तेल येत नाही. पण जागतिक बाजारातील तेल किंमत वाढल्यास अमेरिकन ग्राहकांनाही महागाईचा फटका बसतो. हे अमेरिका जाणून आहे. त्यासाठी हा युद्धाचा डाव खेळण्यात येत आहे..भारताची भूमिकाचार मार्च रोजी अमेरिकेन पाणबुडीने हल्ला करून हिंद महासागरात इराणची युद्धनौका बुडविली. यामध्ये ८७ इराणी सैनिक मारले गेले. ही युद्धनौका भारतातील युद्ध सराव करून परतत होती. भारताच्या विनंतीस मान देऊन इराणने या युद्ध सरावात सहभाग घेतला होता. ही युद्धनौका बुडत असताना श्रीलंकेने मदत केली आणि त्यावरील काही सैनिकांना वाचविण्यात त्यांना यश आले. खरे तर भारताने या घटनेवर प्रतिक्रिया देणे अपेक्षित होते, कारण ही युद्धनौका भारताची पाहुणी होती. इतकंच नाही तर अयातुल्ला खामेनेई यांच्या हत्येवरही भारताची अधिकृत प्रतिक्रिया आली नाही..जेव्हा एखाद्या राष्ट्राचा प्रमुखाचे निधन होते, तेव्हा त्यावर अन्य देशाने शोक व्यक्त करणे हा शिष्टाचार आहे. मात्र, भारताने या वेळेसही सावध मौन बाळगणे पसंत केले. अमेरिका नाराज होऊ नये हा त्यामागील उद्देश असेल तर मग प्रश्न असा पडतो की भारतासारख्या जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाला स्वतःची भूमिका आणि मत ठरविण्याचा अधिकार आहे की नाही? बळी तो कान पिळी या धोरणाला विरोध करणे गरजेचे आहे. कोणी दुखावेल म्हणून नेहमीच संतुलित भूमिका घेणे भारतासारख्या विशाल सार्वभौम राष्ट्राला निश्चितच भूषणावह नाही.: ८२७५२९१५९६(लेखक आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.