Fertilizer Supply Chain: टंचाईच्या भीतीने यंदा भर उन्हाळ्यात गेल्या हंगामाच्या तुलनेत आतापर्यंत पावणेचार लाख टन खते जादा विकली गेली आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांनी भीतीपोटी साठवणूक न करता गरजेपुरती खते विकत घ्यावीत, असे आवाहन कृDepartmentषी विभागाने केले आहे. .राज्यात गेल्या खरिपात मेच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत २.२३ लाख टन युरियाचा पुरवठा झाला होता. यंदा हाच पुरवठा २.१७ लाख टनापर्यंत झालेला आहे. याचाच अर्थ कंपन्यांनी पुरवठ्यात फारशी कपात केलेली नाही. मात्र या हंगामात युरियाची विक्री दुप्पट झाली आहे. आतापर्यंत २.२८ लाख टन युरिया विकला गेला आहे. गेल्या हंगामात मेच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत युरियाची विक्री केवळ १.१७ लाख टन इतकी होती..Urea Shortage: शेतकऱ्यांना तातडीने युरिया उपलब्ध करून द्या.केंद्राने २०२३, २०२४ व २०२५ या तीनही खरीप हंगामात राज्यासाठी दरवेळी युरियाचा १५ लाख टनांच्या पुढेच पुरवठा केला होता. यंदादेखील राज्याला साडेपंधरा लाख टन युरिया मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये. तसेच टंचाईने घाबरून खरेदी (पॅनिक बाईंग) टाळायला हवी. गरजेपुरताच युरिया खरेदी करावा, असे कृषी आयुक्तालयाचे म्हणणे आहे..Urea Shortage: युरिया तुटवड्याची समस्या कृषी मंत्र्यांच्या दालनात.पश्चिम आशियातील युद्धस्थिती व त्यातून विस्कळीत झालेल्या कच्चा मालाचा पुरवठा यामुळे इफ्को व कृभकोचे निर्मिती प्रकल्प गेल्या महिन्यात बंद होते. मात्र आता दोन्ही प्रकल्प चालू झाले आहेत. नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडचे एक बंद असलेले युनिटदेखील चालू झाले आहे. राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर्स (आरसीएफ) कंपनी राज्यासाठी युरियाचा सर्वांत मोठा पुरवठादार आहे. आरसीएफच्या थळ व ट्रॉम्बेमधील युरिया निर्मिती केंद्रे काही दिवसांपूर्वी अर्धवट क्षमतेने चालू होती. परंतु आता स्थिती सुधारली आहे. आरसीएफमधील युरिया निर्मिती पूर्ण क्षमतेने होते आहे. त्यामुळे ऐन खरिपात आरसीएफकडून पुरेसा पुरवठा होऊ शकतो, असा अंदाज कृषी विभागातील अधिकारी वर्तवित आहेत..आयात होणाऱ्या युरियाची स्थितीदेखील लक्षणीय सुधारल्याचे खत कंपन्यांचे प्रतिनिधी सांगत असल्याचे कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. राज्यात पूर्ण आयातीचा युरिया एकूण पुरवठ्याच्या २० टक्के आहे. आयात डीएपीचा वाटा ४० टक्क्यांपर्यंत आहे. ‘‘आयात युरिया व डीएपीचा पुरवठा अजूनही पूर्ण क्षमतेने सुरू नाही. परंतु गेल्या महिन्याच्या तुलनेत डीएपीपेक्षाही युरियाचा पुरवठा मात्र सुधारला आहे. त्यामुळेच चालू खरिपासाठी आतापर्यंतचा उपलब्ध युरियाचा एकूण साठा ७.२६ लाख टन व डीएपीचा साठा २.५५ लाख टनांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या हंगामात युरिया, डीएपीचा हाच एकूण साठा या कालावधीत अनुक्रमे ८.४२ लाख टन व १.२१ लाख टन होता,’’ अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली..केंद्र शासनाने मंजूर केलेल्या कोट्याप्रमाणे राज्यात बऱ्यापैकी युरियाचा पुरवठा होतो आहे. तसेच सध्या युरियाचा साठादेखील चांगला आहे. शेतकऱ्यांनी भीतीयुक्त खरेदी न करता गरजेप्रमाणेच युरिया विकत घ्यावा.- सुनील बोरकर, कृषी संचालक, निविष्ठा व गुणनियंत्रण विभाग.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.