Urea Fertilizer: राज्यात युरिया खताचा वापर वाढला; १.३६ लाख टनांनी वाढ!

Fertilizers Usage: राज्यातील २८ जिल्ह्यांत यंदा १.३६ लाख टन युरियाचा अधिक वापर झाला आहे. चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी अधिक खत वापरल्याने गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत युरिया खताचा वापर वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
Urea
UreaAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News: रासायनिक खताचा वापर कमी करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यंदा चांगल्या पावसामुळे सुगी वाढल्याने गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत (२०२४-२५) राज्यातील २८ जिल्ह्यांत १ लाख ३६ हजार टन युरिया खताचा वापर वाढला आहे. २८ जिल्ह्यांपैकी १० जिल्ह्यांत गेल्या वर्षीपेक्षा दुपटीने वापर झाला आहे. अकोला, कोल्हापूर, नांदेड, सांगली, ठाणे व वाशीम या सहा जिल्ह्यांत मात्र युरिया खताचा वापर कमीच आहे.

राज्यात खरिपाचे १४१ लाख हेक्टर, तर रब्बीचे राज्यात रब्बीचे ५३ लाख ९६ हजार ९६९ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. खरिपात १४२ लाख हेक्टरवर, तर रब्बीत सरासरीएवढे क्षेत्रावर पेरणी झाली होती. उन्हाळी पिकेही बऱ्यापैकी घेतली जातात. खरिपात सोयाबीन, कपाशी या प्रमुख पिकांसह मूग, उडीद, तूर, भात, ही पिके तर रब्बीत ज्वारी, हरभरा, मका, गहू ही प्रमुख पिके घेतली जातात.

Urea
Urea Use : युरियाचा औद्योगिक वापरासाठी विक्रीचा प्रकार उघड

खरीप, रब्बी व उन्हाळी अशा तीनही हंगामांत कांद्याचे पीक घेतले जातात. शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा कमी करून सेंद्रिय खतांचा वापर करावा यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे मागील तीन वर्षांत रासायनिक खताचा वापर कमी झाला. मात्र यंदा पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने युरिया खताचा सरासरीच्या तुलनेत राज्यातील २८ जिल्ह्यांत वापर वाढला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

खताची पॉस मशिनवर विक्री होते, त्यातून शासनाकडे वापराची माहिती संकलित झाली आहे. त्यानुसार २०२१-२२, २०२२-२३, २०२३-२४ या तीन वर्षांत सरासरी ४ लाख ६७ हजार ६४० टन युरिया खताचा वापर झाला. यंदा (२०२४-२५) मध्ये जानेवारी अखेरपर्यंत ६ लाख ०४ हजार ४७ टन युरियाचा वापर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यंदा १ लाख ३६ हजार ४०७ टन युरिया खताचा अधिक वापर झाला आहे. खरिपात कापूस, मका, बाजरी, कांद्यासह रब्बीत ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांसाठी सर्वाधिक युरियाची मागणी असते. यंदा पावसाचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे पिकांची स्थिती चांगली असल्याने यंदा युरियाचा वापर वाढल्याचे जाणकार सांगत आहेत.

Urea
Agriculture Fertilizers: चाचणी न घेताच वाटले दीडशे कोटींचे विद्राव्य खत

चार वर्षांतील युरिया खतांचा वापर (टनांमध्ये)

२०२१-२२ : ५,२२,४५२

२०२२-२३ : ५,०१,६६८

२०२३-२४ : ३,८७,७८३

२०२४-२५ : ६,०४,०४७

गत वर्षीपेक्षा युरियाचा वापर (टक्के)

अहिल्यानगर ः २७.०४, अमरावती ः ८.०३, छत्रपती संभाजीनगर ः ५८.०५, बीड ः ७०.०२, भंडारा ः ९९.८८, बुलडाणा ः १२.०, चंद्रपूर ः ८२.०३, धुळे ः १८.०, गडचिरोली ः १३४.०४, गोंदिया ः १२४.००, हिंगोली ः ६.०७, जळगाव ः ५३.०४, जालना ः७७.०४, नागपूर ः ७.०६, लातुर ः २५.०४, नंदुरबार ः ४४.०२, नाशिक ः ३३.०२, उस्मानाबाद ः २९.०५, पालघर ः १.०८, परभणी ः ६१. ०४, पुणे ः ३४.०७, रायगड ः १.०४, रत्नागिरी ः १७१.०९, सातारा ः २१.०७, सिंधुदुर्ग ः १७३.०७, सोलापूर ः ३७.०६, वर्धा ः ००.९, यवतमाळ ः ७.०२ (३० जानेवारीअखेर)

शेतीसाठी सेंद्रिय खतांचा वापरच फायदेशीर आहे. मी दहा वर्षांपासून रासायनिक खतांचा वापर बंद केला आहे. सेंद्रिय, जैविक खतांच्या वापरातून दर्जेदार पीक येते, उत्पादनातही वाढ होते. शिवाय मातीची गुणवत्ता, सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. युरियाद्वारे मिळणारा नायट्रोजन गोमूत्रापासून तयार केलेल्या स्लरी अथवा गांडूळ खताद्वारेही मिळतो. यामुळे युरियापेक्षाही चांगला फायदा होतो.
संजय वाकचौरे, शेतकरी, कोकणगाव, ता. अकोले `

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com