Mumbai News: कृषी विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी (ता. ११) करण्यात आले. सह्याद्री अतिथिगृहात हा कार्यक्रम झाला. ‘शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी’ हे नवीन घोषवाक्य असून नव्याने बोधचिन्ह बनविण्यात आले आहे. या वेळी विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. .या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह अन्य मंत्री उपस्थित होते. बोधचिन्ह स्पर्धेतील विजेता आणि घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला..Agriculture Department Logo: कृषी विभागाच्या नवीन बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण .कृषी विभागाचे विद्यमान बोधचिन्ह सुमारे ३८ वर्षांपूर्वी तयार करण्यात आले होते. या कालावधीत शेतीत तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण, नैसर्गिक शेती, हवामानबदल आणि उत्पादनाच्या नव्या दिशा अशा अनेक मूलभूत परिवर्तनाच्या पार्श्वभूमीवर विभागाची दृश्य आणि संवादात्मक ओळख अद्ययावत करण्याची गरज निर्माण झाली होती. या उद्देशाने कृषी विभागाने खुली स्पर्धा आयोजित केली होती..या स्पर्धेत जास्तीत जास्त प्रस्ताव प्राप्त व्हावेत यासाठी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर सार्वजनिक आवाहन करण्यात आले होते. कला महाविद्यालयातील आणि कृषी विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक, अभ्यासक, कलाकार, डिझायनर्स, लेखक, अधिकारी, कर्मचारी आणि अन्य इच्छुक व्यक्तींना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या स्पर्धेत ७६१ बोधचिन्ह प्रस्ताव आणि ९४९ घोषवाक्य प्रस्ताव प्राप्त झाले होते. .Agriculture Department :कृषी विभागाने बदलले बोधचिन्हासह घोषवाक्य.या प्रस्तावांचे परीक्षण करण्यासाठी कृषी आयुक्तांच्या मान्यतेने समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने प्रत्येक प्रस्तावाचा तपशीलवार अभ्यास करून उत्कृष्ट कल्पनांची निवड केली. अंतिम निवड समितीने शासनास प्रत्येकी तीन बोधचिन्ह आणि तीन घोषवाक्यांची शिफारस केली, ज्यापैकी एकाची अंतिम निवड शासनाने केली..यामध्ये भुसावळच्या वीरेंद्र भाईदास पाटील यांच्या क्रेझी क्रिएशन्स आणि घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्या सिद्धी भारतराव देसाई (परभणी) यांची निवड करण्यात आली. या वेळी कृषी आयुक्त सूरज मांढरे, संचालक रफीक नाईकवडी आणि कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या वेळी श्री. भरणे म्हणाले, ‘‘कृषी विभागाचे हे नवे बोधचिन्ह म्हणजे केवळ प्रतीक नाही, तर महाराष्ट्राच्या शेतीचा आधुनिक चेहरा आहे.’’.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.