Unseasonal Rain: उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा कहर; निफाड, भुसावळ व चोपड्यात गारपीट
Maharashtra Weather Update: राज्यातील उत्तर भागात निसर्गाचा लहरीपणा पुन्हा दिसून आला आहे. राज्यातील वातावरणात अचानक बदल खानदेशातील भुसावळ आणि चोपडा तालुक्यांत काल संध्याकाळी (ता.२७) अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.